पातळ शौचास होत असेल तेव्हा त्या माणसास ‘अतिसार’ झाला अस म्हणतात. जेव्हा एखाद्या माणसाला नेहमीपेक्षा अधिक वेळा आणि द्रवमिश्रीत मलाचे शौचाबरोबर आंव आणि रक्त पडत असेल तर त्या आजाराला ‘संग्रहणी’ असे म्हणतात. अतिसार (डायरिया) व संग्रहणी (डिसेंटरी) मध्ये फरक असा आहे. की, अतिसारामध्ये नुसतेच द्रवमिश्रीत मळाचे शौचास होते. शौचाचे वेळी कुंथावे लागत नाही. तर संग्रहणीमध्ये मळाबरोबर आंव आणि रक्त पडत असते. शौचाचे वेळी आणखी आंव पडून जावी म्हणून रोगी कुंथत असतो व त्यालाशौचाचे अशुद्ध हवा घेतल्यानेही जुलाब होतात. हवामानात फेरफार झाल्याने, थंड हवेच्या जागेवरून लवकर उठावेसे वाटत नाही. भुकेपेक्षा अधिक अन्न खाल्ल्याने, शिळे अन्न खाण्याने, पचनास जड असे अन्न ठिकाणी राहिल्याने रेच होऊ लागतात. कित्येक रोगाच्या शेवटी जुलाब होतात.
लक्षणे :
मळाचा पातळपणा हे अतिसाराचे मुख्य लक्षण आहे. वारंवार शौचास जावे लागते. शौच मलमिश्रीत पातळ असतो. किंवा नुसतेच पाण्यासारखे जुलाब होतात. तोंडाची चव नाहीशी होते. मळमळ सुटते. जिभेवर पांढरा अथवा पिवळा थर जमतो. पोट दुखते व गुबार होते. गुदद्वारावाटे दुर्गंधयुक्त वायू बाहेर पडतो. पोटात दुखल्यामुळे वारंवार शौचास जावेसे वाटते. शौचावाटे कधी-कधी शेंबडासारखा पदार्थ पडतो. वारंवार शौचास जावे लागल्याने हातपाय गळून जातात. पायाच्या पिंढऱ्यात गोळे उठतात. रोग्यास अगोदरपासून मूळव्याधीचा विकार असेल तर अशा रोग्याचे मळाबरोबर रक्ताचे थेंब पडतात किंवा रक्ताची धार लागते. आंतड्यातून रक्त येत असेल तर मळ रक्तमिश्रीत असतो किंवा मळाचा रंग काळा असतो.
उपचार :
सर्वसाधारणपणे अतिसारावर कोणत्याही उपचाराची गरज लागत नाही. जर अतिसार जोराचा असेल व त्यामुळे शरीरातील द्रवाचे प्रमाण वाजवीपेक्षा कमी होण्याचा धोका निर्माण झाला असेल व अतिसार अधिक दिवस राहिला असेल तर शरीराचे पोषण नीट होत नाही म्हणून अशा वेळी औषधाबरोबरच भरपूर द्रव पदार्थ (पाणी, दूध, चहा, कॉफी इत्यादी) द्यावा लागतो. द्रव पदार्थ भरपूर व वारंवार द्यावा. भूक लागेल तसे खाण्यास द्यावे. एखादे वेळी खाण्यामुळे शौचास एक दोन वेळा अधिक जावे लागण्याचा संभव असतो पण घेतलेल्या आहाराचा काही भाग पोटात राहिल्याने शक्ती टिकून राहते. ‘अतिसारावरील औषधे एखाद्या बुचाप्रमाणे कार्य करतात व आतील घाण बाहेर पडू देत नाहीत व घाण आतले आत पडून राहते’ असे निसर्गोपचार पद्धतीच्या पुरस्कर्त्यांचे म्हणणे आहे पण खरे पाहिले तर औषधोपचारामुळे नवीन धातू विकृती (रोगाची वाढ) होत नाही व अगोदरपासून असलेली घाण बाहेर पडली की अतिसार थांबून जातो. त्याच प्रमाणे अतिसाराची घाण लवकरच निघून जावी म्हणून कोणी जुलाबाचे औषध देतात पण त्यामुळे घाण तर निघून जात नाहीच पण रोग्याची अवस्था मात्र अधिक खराब होते.
चिकित्सा :
सर्वसाधारणपणे अतिसाराची चिकित्सा पौष्टिक आहार व द्रव पदार्थाचे भरपूर सेवन यानेच होते. मीठ व साखरयुक्त पाणी भरपूर प्रमाणात देत जावे. पण या आजारामुळे फार लवकर शक्ती क्षीणता येत असल्याने औषधोपचाराची गरज असते. अतिसाराचा आजार फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. अतिसारामुळे रोगी अतिशय क्षीण झाला असेल आणि तोंडावाटे औषध घेण्याच्या परिस्थितीत नसेल अथवा नाडी क्षीण डोळे खोल व शक्तीक्षीण अशी अवस्था झाली असेल तर त्यास सलाईन लावण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
आयुर्वेदिक औषधामध्ये –
१) लघु गंगाधर चूर्ण
२) वृध्द गंगाधर चूर्ण
३) बिल्वादी चूर्ण
४) जातिफलादि चूर्ण यांच्यापैकी कोणतेही एक चूर्ण दर वेळी 1gm दिवसातून दोन वेळा पाण्याबरोबर द्यावे.
५) संजीवनीवटी
६) कुरजघनवटी यांच्यापैकी एक औषधाच्या दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा मधातून द्याव्या.
७) कुटजारिष्ट प्रत्येक वेळी दोन चमचे औषध पाण्यात मिसळून दिवसातून तीन वेळा द्यावे.
८) कनक सुंदर रस 250mg दिवसातून तीन वेळा ताकाचे अनुपानातून द्यावा.
वरील कुठलाही उपाय करण्या अगोदर किंवा दिलेली औषधे तज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावीत.