अपेंडिसायटिस / APPENDICITIS

आंत्रपुच्छदाह पोटातील मोठे आतडे व लहान आतडे यांच्या सांध्यावर करंगळीच्या आकाराचे एक लहानसे, पोकळ व एका बाजूने बंद असे शेपूट खाली उजव्या जांघेकडच्या बाजूस लोंबत असते. त्याला आंत्रपुच्छ अथवा आतड्याचे शेपूट असे म्हणतात. आपण सेवन केलेल्या अन्नाचा पाचक भाग लहान आतड्यात मोठ्या आतड्यात शोषला जातो. व बाकीचा निरूपयोगी चोथा भाग आतड्यातून ढकलताना मळच्या स्वरूपातील हा निरूपयोगी भाग एखादे वेळी या पोकळ शेपटात जाऊन तुंबून बसतो व आंत्रपुच्छदाह सुरू होतो. आंत्रपुच्छाची जागा लक्षात ठेवणे सोपे आहे. बेंबीपासून उजव्या मांडीकडील कोपऱ्यात ओटीपोटामध्ये आंत्रपुच्छाचे ठिकाण आहे. आंत्रपुच्छ हा एक निरूपयोगी अवयव आहे. शारीरिक घडामोडीत त्याला कसलेही काम करावयाचे नसते. त्याला काही आजार झाला तरच त्याच्याकडे लक्ष द्यावे लागते. मात्र त्याला आजार झाला असताना उपचाराची हयगय झाली तर मरणसुध्दा ओढवते. याच कारणामुळे त्याची माहिती असणे आवश्यक आहे.

आंत्रपुच्छदाह (अपेंडिसायटिस) मध्ये बेंबीजवळ प्रथम दुखावयास सुरुवात होते. नंतर हे दुखणे उजव्या बाजूस ओटीपोटात खाली सरकते. दाबले तर सूज हातास लागते. ताप, वांती, मलावरोध इत्यादी लक्षणे असतात. लघवी करताना त्या जागी अधिक दुखते, रोग साधारण असेल तर तीन - चार दिवसात हा उपाय आजार आपोआप बरा होऊन जातो.

लक्षणे:-
आंत्रपुच्छ दाहाचे मुख्य लक्षण असे आहे की बेंबीजवळ व उजव्या ओटीपोटात भयंकर दुखावा असतो व तो सारखा वाढतच जातो. दुखावा प्रथम बेंबीजवळ सुरू होतो आणि नंतर खालच्या भागात उजव्या ओटीपोटात पसरतो भूक लागत नाही. ओकारी व मलावरोध असतो. दुखाव्याचे जागी हात लावला तर अधिक दुखावा होतो.

ओटीपोटातील स्रायूमध्ये ताठपणा आलेला असतो. सौम्य प्रकारचा रोग असेल तर काही उपचार न केले तरी तो बरा होतो पण एकसारखा जोराचा ताप, एकसारखी उचकी व नाडीची गती वाढणे ही लक्षणे असतील तर ती धोकादायक आहेत. आंत्रपुच्छात गळू उठले असेल व त्यात पू झाला असेल तर त्याला ऑपरेशन करून घ्यावे लागते. आजारी माणसास एक वेळ एनिमा देऊन पहावा. त्याने पोट हलके होण्याची शक्यता असते. फक्त पातळ पदार्थ सेवन करावेत. एका अंगावर झोपवून ठेवून संपूर्ण विश्रांती द्यावी.

आयुर्वेदिक ओषधामध्ये


१) गंधक रसायन 250 mg
२) सूत्र त्रिफळा 250 mg दिवसातून तीन वेळा पाण्याबरोबर द्यावे.
३) अग्नितुंडीर एक ते दीड गुंज तूप साखरेतून दिवसातून तीन वेळा द्यावा.

Leave a Comment