आमवात हा रोग ज्वर आणि सांधेदुखी असणारा सांसर्गिक आजार आहे. हा आजार ५ ते १५ वर्षाचे मुलांना प्रामुख्याने होतो दाट राहणाऱ्या समाजामध्ये व गरीब कुटुंबामध्ये अधिक प्रमाणात आजारात अनुवंशिकता ही असते.
लक्षणे –
प्रथम अंग कसकसल्यासारखे होऊन अंगात ताप भरतो. ताप १०३ ते १०५ अंश फॅरनहाअिट पर्यंत चढतो. नंतर मनगटाचा सांधा पायाचा घोटा यावर सूज येते. त्यात ठणका असतो. नंतर गुडघा, कोपरा खांदा यांच्या सांध्यावर ही क्रमाक्रमाने सूज येते. सूजेची जागा गरम लागते. व तीथेच ठणका सूज असतो. सुजलेल्या भागावर त्वचेखाली वर्तुळाकार लाल रेषा किंवा गाठी दिसून येतात. सूजेच्या जागी भयंकर वेदना होतात. सुजलेल्या अवयवात हालचाल झाली तर ठणका अधिक होतो. काही काळानंतर एका जागेवरची सूज, लाली व ठणका कमी होतात व दुसऱ्या जागेवर सूज, लाली व ठणका सुरू होतात. सांध्यावर आली आणि तो भाग लाल झाला तरी त्यात पू मात्र होत नाही. आजाराचा हृदयावर परिणाम होत असतो. हा रोग आजाराची जागा सारखी बदलीत असतो. एका सांध्यावरची सूज कमी झाली की दुसऱ्या सांध्यावर सूज सुरू होते. मनगटावरून घोट्यावर, घोट्यावरून गुडघ्यावर, गुडघ्यावरून कोपरावर आणि उजव्या बाजूच्या सांध्यावरून डाव्या बाजूच्या सांध्यावर असा सारखा बदल होत राहतो. साधारणतः रोगी दोन आठवड्यात बरा होतो. आजार बरा होऊ लागला म्हणजे ताप कमी होतो. घाम भरपूर येतो. घामाला आंबट वास असतो. हा रोग आजाराची जागा सारखी बदलीत असल्याने व हाडाच्या सांध्यावरच फक्त त्रास होत असल्याने रोग ओळखणे कठीण जात नाही. आजारामुळे भयंकर अशक्तपणा येतो. शरीरास ही पिवळटपणा येतो. या आजारात हृदयविकार जडण्याची शक्यता असते. एकदा बरा झालेला आजार पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते. या आजारात रक्ताची E.S. R. तपासणी केली असता पातळी वाढलेली असते.
उपचार
१) आजारी माणसाने अंथरूणावर पडून संपूर्ण विश्रांती घ्यावी, आजार बरा झाल्यानंतरही काही दिवस निदान एक आठवडा विश्रांती घेतलीच पाहिजे.
२) सुजलेल्या भागास गरम पाण्याचा शेक द्यावा. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळावा व तो गरम टॉवेल सांध्यावर झाकून ठेवावा. म्हणजे त्याचा शेक बसतो.
३) कोठा साफ होण्यासाठी जुलाबाचे औषध घ्यावे. सोनामुखी व मनुका यांचा काढा करून दिला तर मुले देखील ते औषध हौसेने घेतात
आयुर्वेदिक पद्धतीमध्ये- प्रथम आमाचे पचन करणारे औषध
१) एरंडेल तेल 30 ml रात्री पिण्यास द्यावे . या औषधाबरोबर
२) महावात विध्वंस 250mge दिवसातून तीन वेळा द्यावे.
३) महावात विध्वंस 250 mg + गुग्गुळ 250 mg दिवसातून तीन वेळा द्यावे.
४) महारास्नादिकाढा प्रत्येक वेळी सिंहनाद चार चमचे दिवसातून तीन वेळा द्यावे.
५) चित्रक हरितकी दोन चमचे दिवसातून व दोन वेळा द्यावे.
६) गंधर्व हरीतकी रात्री झोपताना दोन चमचे कोमट पाण्याबरोबर द्यावे.
७) दुखणाऱ्या भागावर विषगर्भ तेलाने मालिश करावे गरम वाळूच्या पोटलीने त्या भागास शेक द्यावा.
८) गुग्गुळ व सुंठ समप्रमाणात घेऊन त्यांच्या 250 mg ची गोळी प्रत्येक वेळी दिवसातून तीन वेळा द्यावी.
९) हरीतकी गुग्गुळ 500 mg प्रत्येक वेळी या प्रमाणात दिवसातून दोन वेळा द्यावी.
१०) आमवाताच्या आजारात प्रथम पासूनच हृदयाचे रक्षण करण्यासाठी पाचकेंद्र रस दिवसातून तीन वेळा द्यावा.
११) आमवाताच्या लेपासाठी दशांग लेप यांचा गरम-गरम लेप दिवसातून तीन वेळा दुखणाऱ्या भागावर द्यावा.
१२) उदयभास्कर रस 200 mg
१३) महायोगराज गुग्गुळ 250 mg दर वेळेस प्रमाणे दिवसातून तीन वेळा द्यावे, पंचकोल सिद्ध पाणी पिण्यास द्यावे. आमपाचक काढा (सुंठ, धने, नागरमोथा, वाळा, इंद्रजव) द्यावा. प्रवाहिकेचा इतिहास असल्यास रसपर्पटीचा चांगला उपयोग होतो.
आम निर्माण न होईल असा आहार द्यावा. अभिष्यंदी पदार्थ टाळावेत शून पाणी पिण्यास द्यावे. आजारानंतर शक्तिवर्धक औषध देण्याची व काही काळ पर्यंत भरपूर विश्रांती घेण्याची गरज असते .
टीप- वरील कुठलाही प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.