8 मार्च 2022 रोजी आरोग्यनिती आधार संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शंभरी पार महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महिला आज काल पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत परंतु त्याच बरोबर महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे म्हणून शंभरी पार महिलांचा स्वतःचे व संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सांभाळल्या बद्दल आरोग्यनिती आधार संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे सन्मान करण्यात आला.
खरं तर फक्त 8 मार्च स्त्रियांचा दिवस नसून प्रत्येकाचा प्रत्येक दिवस हा स्त्री मुळे आहे… सन्मानमूर्ती
सुलोचना केसरीनाथ गोसावी- टिळक नगर, सिल्लोड👇
शेवंताबाई गणपत पवार- बार्शी, सोलापूर👇
निर्मला भिकाजी वैद्य👇
पार्वती शंकर चौगुले👇
अहिल्याबाई राजाराम घोलप-चांदवड👇
बिकाबाई रामभाऊ सालवे- जाफराबाद, जालना👇
तुळसाबाई नरहरी खंडागळे- गेवराई बीड👇
जागतिक महिला दिन जरी मार्च १९०८ रोजी सुरू करण्यात आला असला तरी भारतामध्ये खूप पूर्वीपासून स्त्रियांना पुरुषापेक्षा ही पुढचे स्थान दिले आहे,
भारतात शक्ती, विद्या आणि लक्ष्मी हे स्त्रीचेच रूप मानले आहे. एवढंच काय तर इतिहासात देखील शुर वीर योध्याच्या नावापुढे आईचा उल्लेख येतो…
देवकी नंदन कृष्ण
गंगा पुत्र भीष्म
कुंती पुत्र अर्जुन
अंजनी पुत्र हनुमान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!