- ऋतुमानानुसार आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. हवेत सारखे बदल होत असतात. कधी थंड, कधी उष्ण, तर कधी दमट अशा हवेमुळे परिणाम हा आपल्या आरोग्यावरही चांगले वाईट होत असतात. मनुष्य हे सृष्टेिचेच अपत्य असल्याने ह्या हवेतील बदलानुसारच मनुष्याच्या आयुर्वेदाचा महत्त्वाचा सिध्दान्त आहे. मनुष्याने सृष्टीमधील बदलत्या हवामानाला अनुकूल असे आपले खाणे, पिणे, वागणे ठेवले नाही तर, त्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. म्हणूनच आयुर्वेदात प्रत्येक ऋतूत कोणता व कसा आहार घ्यावे हे सांगितले आहे. जेणे करुन आपल्या आरोग्याचे बाहेरील वातावरणाशी संतुलन राहील.
उत्तरायण आणि दक्षिणायन
वर्षातील ३६५ दिवसांतील हवामानाचे निरीक्षण केल्यास उष्ण व थंड अशा दोन प्रमुख प्रकारांत याचे वर्गीकरण करता येईल. जेव्हा हवामानात सूर्यशक्तीचा म्हणजेच उष्णतेचा, कोरडेपणाचा जोर असतो तेव्हा या काळाला आदानकाल किंवा उत्तरायण (२२ डिसेंबर ते २१ जून)असे म्हणतात. अशा वातावरणात मनुष्याची शक्ती फारशी झपाट्याने वाढू शकत नाही कारण मनुष्य शरीराला हे हवामान फारसे अनुकूल नसते, यालाच बाहेरील हवामान मनुष्याची शक्ती कमी याउलट जेव्हा हवामानात चंद्रशक्तीचा किंवा शीतगुणाचा जोर असतो तेव्हा या कालखंडाला दक्षिणायन (२२ जून ते २१ डिसेंबर) असे म्हणतात. या कालात मनुष्याची शक्ती झपाट्याने वाढू शकते, कारण हे वातावरण वेगळा आहार विहार मनुष्य शरीराला अधिक अनुकूल असते.
ऋतू
प्रति वर्षाचे एकूण सहा ऋतूत विभाजन केले आहे. प्रत्येक ऋतू दोन महिन्यांचा असतो. चरक, सुश्रुत या आयुर्वेदाच्या मूल संहिता ग्रंथांत केलेले ऋतू व महिने यांचे विभाजन आज बदललेले दिसून येते.
खालील दिल्याप्रमाणे ऋतूनुसार आपला आहार-विहार कसा असावा हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.