तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे नुकसान | ही चूक कधीच करू नका.

नेहमी आपण ऐकत असतो रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा व सकाळी उठल्यानंतर ते पाणी तोंड न धुता लगेच प्या. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण याबद्दलची पूर्ण माहिती पाहुयात यामध्ये किती सत्य आहे?
तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिताना आपण काय काळजी घ्यावी लागेल व त्याचे फायदे आणि नुकसान या दोन्ही गोष्टींबद्दल आपण आजच्या या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.

तांब्याच्या भांड्यात पाणी

रात्रभर पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून सकाळी ते उठून प्यावे असे कुठल्याही आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये सांगितलेले नाही. जेव्हा आपण रात्री पाणी भरून ठेवतो तेव्हा त्या भांड्याचा पाण्यावर सुद्धा असर होतो. एवढा जास्त वेळ पाणी भांड्यामध्ये ठेवल्यामुळे पाण्याची चव बदलते तसेच पाण्यावरती एक लेयर निर्माण होते.
आयुर्वेदाच्या नुसार हे पाणी अहितकर म्हणजेच ज्यामुळे दोषांची वाढ करणारे असते.
या ऐवजी तुम्ही सकाळी सूर्योदयानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते पाणी सूर्यास्त होईपर्यंत पिऊ शकता. सकाळी भरून ठेवलेल्या पाण्याचा फायदा असा होतो की सूर्यप्रकाशाने पाण्याचे निर्जंतुकीकरण होते आणि हे पाणी आपल्याला एकदम शुद्ध स्वरूपात मिळते जेणेकरून आपण तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा आपल्या शरीरासाठी लाभ करून घेऊ शकतो.
अष्टांगृदयम या ग्रंथामध्ये सांगितले आहे की न पीबेत सूर्येदू पवनं अदृष्टम |
याचा अर्थ असा की ज्या पाण्यावर सूर्याची किंवा चंद्राची दृष्टी पडली नाही तसेच ज्या पाण्याला हवेचा स्पर्श नाही असे पाणी पिण्यायोग्य नसते.
आता तांब्याच्या भांड्यातील पाणी सर्वांसाठीच हितकारक असेल असे नाही कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. आयुर्वेदामध्ये तांब्याचे वर्णन उष्ण प्रवृत्ती चा धातू म्हणून केले आहे.
हे पाणी मुख्यत्वे ज्यांची कफ प्रकृती आहे, ज्यांच्या शरीरात स्थूलता किंवा मोटापा आहे ज्यांची बैठकी जीवनशैली आहे, सर्दी खोकला दमा अजीर्ण असे त्रास त्यांना आहेत त्यांच्यासाठी हे पाणी अतिशय उपयुक्त आहे.

परंतु ज्यांची वातप्रकृती आहे, ज्यांना अल्सर आहे किंवा महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या आहेत अशांनी जर हे पाणी पिले तर फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त सोसावे लागतील.

जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यात पाणी पिऊन त्या पाण्याचे आपल्या शरीराला लाभ व्हावेत असे वाटत असेल तर खालील गोष्टींचा विचार तुम्ही नक्की करायला हवा.

  1. ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी पिणार आहात ते भांडे शुद्ध तांब्यापासून बनवलेले तसेच स्वच्छ असायला हवे.
  2. तांब्याच्या भांड्याच्या आत मधल्या आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूने तांबे वापरलेले हवे कुठलाही दुसरा धातू त्यामध्ये मिक्स नसावा.
  3. भांडे स्वच्छ घासून घेतलेले असावे. भांडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू किंवा चिंचेचा वापर करू शकता.
  4. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यामुळे पाण्याचे ऑक्सिडेशन होते व भांड्याच्या आत मधल्या बाजूस एक लेयर जमा होते, स्वच्छ करणे खूप गरजेचे असते.
  5. एखादे भांडे आत मधून स्वच्छ करता येत नसल्यास जसे की तांब्याची बॉटल,ज्यामध्ये आपला हात जात नाही व आपण त्या बॉटलची स्वच्छता व्यवस्थित करू शकत नाही त्यामुळे सहसा अशी भांडी वापरणे टाळावे.
  6. तांब्याच्या भांड्यात कधीच उकळलेले पाणी, जास्त गरम पाणी टाकू नये. पाणी उकळलेले असेल तर ते आधी थंड होऊ द्यावे व नंतर ते तांब्याच्या भांड्यात टाकावे.
  7. लिंबू सरबत किंवा कुठलेही आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवू नये कारण हे ऍसिडिक असतात. ज्यामुळे तांब्याचे भांडे आणि ऍसिडिक पदार्थ यामध्ये प्रक्रिया होऊन आपल्या शरीरासाठी घातक असे रसायन तयार होते. दही,आचार या गोष्टी सुद्धा तांब्याच्या भांड्यात ठेवू नये तसेच आंबट पदार्थ भांड्यामध्ये शिजवू नये.
  8. अति सर्वत्र वर्जयत् | म्हणजेच कुठलीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास त्याचे नुकसान होतात. म्हणून आपली प्रकृती,वातावरण,तहान,आजार, आजाराची अवस्था या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन मगच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
  9. रोज पाणी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये काही दिवस पाणी पिल्यानंतर काही दिवसाचा गॅप ठेवावा.

7 thoughts on “तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे नुकसान | ही चूक कधीच करू नका.”

  1. छान माहिती मिळाली विशेषतः तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं याबद्दल. खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

    Reply

Leave a Comment