पोटशूळ (Colic)

पोटशूळ म्हणजे पोटात दुखणे. पोटशूळ अनेक कारणांमुळे सुरू होऊ शकते ते खालील प्रमाणे…

१) वातुळ पदार्थ (पोटात वायू धरणारे पदार्थ खाल्ल्याने पोट दुखते)

२) मलावरोध झाल्यानेही पोट दुखते.

३) थंडीमुळे पोट दुखते.

४) जंतामुळे ही पोट दुखते.

५) धास्ती, भिती, चिंता इत्यादी मानसिक कारणाने पोट दुखते.

६) आंतड्याच्या आतील बाजूच्या स्नायू संकोचाने पोट दुखते.

७) पित्तखडा व मुतखडा यांच्या कारणानेही पोट दुखते.

लक्षणे

पोटशूळामध्ये पोटात कळा येतात, पोट आंत ओढल्यासारखे दुखते, पोटात अतिशय तीव्र वेदना होतात त्यावेळी पोट जोरात दाबून धरावेसे वाटते, पोटावर पालथे पडावे वाटते, दाबल्याने दुखावा थोडा कमी होतो, तसेच नाडी मंद चालते, उन्हात काम केल्या सारखा घाम येतो परंतु ताप नसतो, शौचास साफ होत नाही, अपान वायू ही सरकत नाही, लहान मुलांनास मात्र पोटदुखीबरोबर ताप ही असतो,

आयुर्वेदिक औषधांमध्ये

१) शंखवटी दोन गोळ्या प्रत्येक वेळी याप्रमाणे दिवसातून तीन वेळा द्याव्या.

२) शंखभस्म 500 मि. ग्रॅ. दिवसातून दोन वेळा द्यावे.

३) कपर्दिक भस्म दिवसातून तीन वेळा अनुपान पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये औषध मिसळून पिण्यास द्यावे.

घरगुती उपचार

पोटदुखीचा आजार सर्वसामान्य लोकांच्या इतका परिचयाचा आहे की त्यावरील साधे सुधे उपाय ही त्यांना माहीत असतात.

१) शेपा व मेथी समभाग घेऊन त्याचे केलेले सुमारे एक चमचा चूर्ण घोटभर गरम पाण्यात मिसळून द्यावे.

२) ज्वारीच्या दाण्या एवढ्या आकाराचा हिंग तूपामध्ये कालवून द्यावा.

३) लसणाच्या 1-2 कळ्या गिळून टाकाव्या.

४) पोट जड वाटत असेल तर घशात बोटे घालून ओकारी करावी.

५) पोटावर शेकल्याने आराम वाटतो.

६) कोमट पाण्यात खाण्याचा सोडा 1 चमचा मिसळून त्याचे सेवन करावे.

वरील कुठलाही उपाय करण्या अगोदर किंवा दिलेली औषधे तज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावीत.

1 thought on “पोटशूळ (Colic)”

  1. आपण जी प्रत्येक अजारा बाबतीत माहिती देतात ती अचूक व पुर्ण असते. म्हणजे कोणत्या अजारावर कोणते औषध
    आणि त्याची लक्षणे तसेच ऊपाय पण सांगतात.

    सध्या कोरोना या अजाराचा उद्रेक आहे.
    त्या बाबतीत पण मार्गदर्शन करावे.

    Reply

Leave a Comment