प्रथिने, जीवनसत्त्वे ठीक आहेत पण तुम्ही आहारात मॅग्नेशियम योग्य प्रमाणात घेत आहात का?

ऊर्जेचा अभाव:

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवेल. विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवत राहील. अश्या वेळी आहारात मॅग्नेशियम असणारे पदार्थ घ्यावेत…

पायात पेटके आणि मज्जातंतूंचा ताण-तणाव :

मॅग्नेशियम तुमच्या स्नायूंच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. स्नायूंची वाढ, आकुंचन आणि विश्रांती नियंत्रित करते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पायात शिरा तानणे पाय मुरगळणे आणि वळणे असे प्रकार होऊ शकतात.

वारंवार डोकेदुखी:

तुम्हाला वारंवार डोकेदुखीचे कारण समजत नाही? मॅग्नेशियमची कमतरता हे कारण असू शकते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरातील सेरोटोनिनचे उत्पादन कमी होते. त्यामुळे मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नाही. अश्या वेळी आहारात मॅग्नेशियम चे प्रमाण लक्ष्यात घेणे गरजेचे आहे.

झोप न लागणे:

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला झोप कमी येते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे ताण – तणाव वाढू शकतो, हृदय गती वाढू शकते आणि तुम्हाला झोपणे कठीण होऊ शकते.

मोठ्या आवाजाचा त्रास:

असा मोठा आवाज कोणीही सहन करू शकत नाही, परंतु मॅग्नेशियमची कमतरता तुम्हाला अधिक संवेदनशील बनवते. कमी मॅग्नेशियम तुमची मज्जासंस्था कमकुवत करू शकते आणि तुम्हाला अधिक संवेदनशील बनवू शकते.

बद्धकोष्ठता:

तुमच्या आहारात फक्त फायबरची कमतरता नाही तर मॅग्नेशियमची कमतरता देखील तुमचे पचन बिघडू शकते. तुम्हाला याची खात्री होईल जेव्हा तुम्हाला कळेल की बहुतेक पाचक औषधांमध्ये मॅग्नेशियम असते.

वरील प्रयोग करण्याआधी तज्ञाचा सल्ला नक्की घ्या

Leave a Comment