बॉडी बिल्डिंग आणि जिम(Bodybuilding and gym):-

आजच्या युगात जिमला जाणे, एक फॅशन बनली आहे. चांगले शरीर मिळवणे किंवा शरीरावरील चरबी कमी करणे, मसल बनवणे किंवा वाढणारे वजन कमी करणे,यासाठी कमी वेळेत जिमपेक्षा चांगले उपाय कोणाकडे असेल असे वाटत नाही. आणि असे पिळदार चांगले शरीर कोणाला नको आहे,

जिमला जाण्याबरोबरच आपल्या आहारात व दिनचर्येत बदल करायला हवा म्हणजे आपल्याला हवा असलेला शरीराचा आकार मिळेल.

सहसा जिम मधील व्यायामाला वेट ट्रेनिंग म्हटलं जातं, आणि हे व्यायाम प्रकार आपल्याला हवं असं उत्तम शरीर देऊ शकतात. परंतु काही गोष्टी वर आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागेल.

शरीराला आराम देणे(Relaxing the body):-
जिम मधील व्यायाम प्रकारामुळे आपल्या शरीरावर खूपच जास्त ताण निर्माण होतो तसेच आपल्या हृदयाची धडधड देखील वाढते शरीरावरती भरपूर प्रमाणात घाम येतो अशा वेळी आपण एक्सरसाइज हळूहळू बंद करावी व शेवटी थोडीशी हलकी कसरत करून शांत बसून घ्यावे व शरीराला आराम द्यावा.

पुरेसे पाणी प्या(Drink enough water):-
आपण करत असलेले व्यायामप्रकार हे खूप मेहनतीच्या व्यायाम प्रकारात मोडतात, त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते व अशावेळी आपल्या शरीराला डिहायड्रेशन पासून वाचवणे गरजेचे असते. त्यामुळे व्यायाम करत असताना देखील घोट-घोट पाणी पिणे फायदेशीर ठरते तसेच व्यायाम संपल्यानंतर आरामात बसून शांतपणे 250-300ml पाणी प्यावे. तसेच दिवसभरात ही पाण्याची कमतरता जाणवणार नाही याची काळजी घ्या. नारळ पाणी पिणे हे ही फायद्याचे ठरते.

वजनाकडे लक्ष द्या (attention to weight):-
जिम करत असताना बऱ्याच वेळी खूप वेगाने वजन कमी होऊ शकते अश्या वेळी आपण व्यायामावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जर आपण कमी वेळात जास्त वजन कमी करण्याकडे लक्ष देत असाल तर ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे योग्य व्यक्तीच्या सल्ल्या शिवाय स्वतः निर्णय घेऊ नये.

स्ट्रेचिंग कसरत सुरू करण्याअगोदर किंवा कसरत केल्यानंतर स्ट्रेचिंग करणे खूप गरजेचे आहे जर आपण स्ट्रेचिंग करत नसाल तर व्यायाम करताना अपघाताची शक्यता आहे तसेच स्ट्रेचिंग केल्याने फक्त मसल मधला ताण कमी होणार नाही तर स्ट्रेचिंग केल्याने स्नायू लवचिक होऊन अपघाताची शक्यता कमी होते.

व्यायामानंतर काय खावे(What to eat after exercise):-
आपला आहार हा प्रोटिनयुक्त असला पाहिजे तसेच जर आपण वजन कमी करण्यासाठी जिम करत असाल तर आपण कर्ब्स कमी घ्यावे, परंतु त्यामध्ये खूप कमतरता नसावी कारण व्यायाम करताना लागणारे कॅलरीजची गरज असते, म्हणून कर्ब्स देखील महत्त्वाचे असतात. त्यामुळे जिम करणार्‍याचा आहार हा परिपूर्ण असावा, शक्यतो जिम करणाऱ्यांनी उपवास करू नये.

व्यायामानंतर काही वेळात आपल्याला 150-200 कॅलरीजची आवश्यकता असते, त्याबरोबर प्रथिने असणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे आपले स्नायू मजबूत बनतात व शरीरात उर्जा ही टिकून राहते.

प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते त्यामुळे जिम मध्ये आपण इतरांशी तुलना करणे योग्य ठरत नाही.
उदाहरणात:- तुम्ही आणि तुमचा मित्र एकच प्रकारची एक्सरसाईज करत असाल, तसेच वजन देखील समान असेल व जिम ट्रेनरचा सल्लादेखील दोघांना सारखाच असला तरीदेखील दोघांच्या शरीरामध्ये बराचसा फरक पाहायला मिळतो. कारण हेच असते की प्रत्येकाच्या शरीराची रचना ही त्याच्या जेनेटिक्स वर अवलंबून असते, त्यामुळे काही लोकांचा अप्पर पार्ट लवकर बनतो तर काही लोकांना थाय मसल बनण्यासाठी वेळ लागतो.

आपल्या सोबतच्या मित्राचे शरीर आपल्या पेक्षा चांगले दिसू लागले आहे, यावर चिंता करू नका आपल्या शरीराच्या जेनेटिक्स नुसार आपले शरीर बनत असते. त्याचबरोबर शरीराचे वेळोवेळी मोजमाप करणे व ब्लड टेस्ट करणे ही फायद्याचे ठरते.

भारतीय व्यायाम पद्धती:- मुगदर कसा फिरवावा? https://youtu.be/EawXaHMiuiA

Leave a Comment