आजकाल माणसाची ‘ झोपे’ची व्याख्या बदलली आहे. घेणारे १०,१२ तास सुध्दा झोप घेतात नाहीतर काही जणं दिवसातून ४,५ तासच झोप घेतात. यांत्रिक युगामध्ये पैशाच्या मागे काहींना पळता पळता विश्रांती घ्यायला, पुरेशी झोप घ्यायलाही सवड नसते. काहींना भरपूर ताणतणाव वाढल्यामुळे झोपही शांत लागत नाही. शारीरिक दमछाक आणि मानसिक ओढाताण त्यात पुरेशी झोप नाही यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
समृद्धी आणि विकासाकडे वाटचाल करत असतानाच बऱ्याच ताणतणावांना सामान्य माणसांना तोंड द्यावे लागत आहे. स्पर्धेच्या या युगात धावपळ तर करावीच लागते, त्यामुळे शारीरिक दमछाक होतेच, मात्र, वेगवेगळ्या मानसिक समस्यांनाही तोंड देत कसरत करावी लागते. त्यामुळे योग्य आणि वेळेवर आहार, व्यायाम या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. त्यातून झोपही मिळत नाही त्यामुळे आरोग्य बिघडते. म्हणून पुरेशी झोप ही हवीच. शांत आणि गाढ झोपेमुळे दिवसभर ताजेतवाने वाटतेच. शिवाय कामाच्या कार्यक्षमतेवरही त्याचे सकारात्मक परिणाम होतात. केव्हा तरी झोप न लागणं किंवा कमी लागणं हे नैसर्गिक आहे. मात्र, अशी परिस्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होत असेल तर ती काळजी करण्याची गोष्ट ठरते.
निद्रानाश ( Insomnia )
ताणतणावामुळे काहींना व्याधी जडते. निद्रानाशाची शकते.
सतत कमी होत जाणारी झोप काही काळानंतर निद्रानाशात रूपांतरीत होऊ शकते.
निद्रानाशाचा विकार ही अतिशय गंभीर बाब आहे. यासाठी झोपेचा थोड्या प्रमाणात त्रास सुरू झाला तरी त्याच्याकडे गांभिर्याने पहायला हवे. झोप कमी लागण्याची नुकतीच सुरूवात असेल तर साध्या साध्या उपाययोजना यावर करता येतात. मात्र, त्यात मनाचे आणि शरीराचे आरोग्य टिकवायचे असेल तर शांत आणि पुरेशी झोप हवीच….
शांत व गाढ झोप हवी असेल तर…
- झोपण्यापूर्वी थंड पाण्याने हातपाय धुवावेत व लगेचच झोपण्याचा प्रयत्न करावा.
- झोपण्याच्या खोलीतील वातावरण व अंथरूण स्वच्छ असावे.
- खोलीत मंद वासाची अगरबत्ती लावावी. या सवयी रोजच अंमलात आणाव्यात, त्यामुळे शांत झोप लागण्यास खूप मदत होते.
- झोपेच्या समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागत असेल तर वेगळे उपाय करावे लागतात.
- कामाचा प्रचंड ताण पडत असेल त्याचा झोपेचा खूप जवळचा संबंध आहे. झोपेवर निश्चितपणे परिणाम होतो. अशा वेळी झोपण्यापूर्वी ऋतूमानानुसार थंड किंवा गरम पाण्याने स्नाने करावे.
- अंथरूणावर झोपल्यावर १०० पासून १ पर्यंत उलटे आकडे म्हणावे.
- सगळे अंग सैल सोडावे व दीर्घ श्वसन करावे.
- झोपून पुस्तक वाचण्यामुळे डोळ्यांना थकवा येतो व डोळे मिटू लागतात.
- झोपण्यापूर्वी वाचन करावे. पाच – दहा मिनिटे पटकन झोप लागते.
- त्यामुळे मेडिटेशनचे प्रकार समजावून घ्यावेत. एखाद्या प्रसंगात रमण्याचा प्रयत्न डोळे मिटून करावा. आपोआप झोप लागते.
- चांगला विचार कल्पावे किंवा आपण आज दिवसभरात काय काय केले आणि काय करायला हवे होते आणि करायला नको होते याची जंत्री डोळ्यासमोर आणावी. एकदम शांत झोप लागते.
- रात्री चांगली झोप लागण्यासाठी दिवसभर आपण खूप नाही पण योग्य दमलं पाहिजे. म्हणजे पडताक्षणी झोप लागते.
- शांत झोप लागण्यासाठी योगासनं अत्यंत उपयोगी ठरतात. नियमितपणे व्यायाम किंवा एखादा खेळ खेळण्यामुळे शरीर पुरेशा प्रमाणात थकते, त्यामुळे रात्री शांत झोप लागते.
- झोपण्यापूर्वी अर्धा कप थंड दूध प्यावे..
- आपले मानसिक आरोग्य नेहमी चांगले ठेवावे. मानसिक संतुलन बिघडलेले असले किंवा ताणतणाव असतील तर झोप येत नाही.
- ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा.
ताणतणाव हे सगळ्यांच्याच आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असतात. रोजच्या आयुष्यातील काही घटना अपरिहार्य म्हणून स्वीकारायला शिकले पाहिजे. गंभीर प्रश्नांबाबत नातेवाईकांशी किंवा जवळच्या मित्र – मैत्रिणींशी मोकळ्या मनाने चर्चा करावी, अश्याने मनावर दडपण न येता योग्य निर्णय घेता येतो. अशा रीतीने हे लक्षात मानसिक आरोग्य आणि शांत झोपेचा खुप जवळचा संबंध आहे हे लक्षात ठेवूनच तसेच वागा. मन फ्रेश, आनंदी ठेवा आणि शांत झोप घ्या…