आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांती हुडकावी लागत आहे. दगदग, धावपळ, स्पर्धा, कलह, क्लेश वाढत आहेत. मनशांती असेल तर सर्व संकटांवर आपण धैर्यानं मात करू शकतो त्यासाठीचे हे उपचार नक्कीच कामी येतील.
१. काम करत असताना थोडासा आराम करायला जर तुम्ही वेळ काढाल तर आंतरिक तणाव आपोआपच जाईल.
२. नेहमी डोळ्यासमोर आपण एका शांत, रम्य, वातावरणात आहोत अशाच जाणीवेने श्वासोश्वास घ्या व अशा सुंदर, रम्य, वातावरणाचीच स्वप्ने पहा
३. शांत वातावरणाला एक गुप्त स्थान समजून त्यात रमून जा म्हणजे आपोआप मनःशांती मिळेल.
४. एक स्फटिक ( क्रिस्टल ) आपल्या हृदयाजवळ पकडून ठेवा जो मानवी ऊर्जा अभिव्यक्त करून शांतीदीपाचे काम करतो.
५. ‘ माझं मन शक्तीने भरलेले आहे ‘ हे वाक्य ३ वेळा शांत वातावरणात उच्चारा अन् एक प्रकारे मनाची तृप्ती मिळवा.
६. शांत वातावरणात तीन वेळा म्हणा, मी माझे ध्येय प्राप्त करणार आहे.
७. ‘ मी सफल होणार ‘ हे वाक्य ‘ स्तब्ध शांततेत आत्मविश्वासाने ३ वेळा म्हणावे.
८. कोणालाही तुमच्या शांत वातावरणात अजिबात व्यत्यय आणून देऊ नका कारण हे पवित्र शांत वातावरण फक्त तुमचंच आहे हे विसरू नका.
९ . शांत व पवित्र वातावरणात राहून आपले ध्येय जे ठरविले आहे, त्याचेच सतत ध्यान करावे. हे ध्यान जो पर्यंत आपली मानसिक शक्ती ऊर्जा रूप घेत नाही. तो पर्यंत करावे अशाप्रकारे आपल्याला पूर्णपणे मानसिक शांती मिळू शकते.
१०. शांत वातावरण शोधा त्याची सुंदरता जाणा. त्या सुंदर जाणीवेने समाधान, तृप्ती मिळेल अशा आवडत्या वातावरणात जाऊन आपण परत मूळ स्थायी मनाने येऊ शकता.
असे हे दशोपचार आपल्या मन शांत करुण ताण दुर करण्यासाठी मदत करतील…