
- आहारातील चुका सुधारणे
- केसांचे रक्ताभिसरण वाढविण्यासाठी मसाज करणे
- बाह्य उपचार
- पोटातून वनौषधी
- नस्य
ज्यांच्या अंगात उष्णता जास्त आहे, पित्त प्रकृति आहे अशांनी आहारातून मांसाहार अंडी, मासे, अति तिखट, अति चमचमीत, तेलकट पदार्थ टाळावेत…
उदा. सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ, चायनीज व जंक फुड, कोल्ड्रींक, चॉकलेट, लोणची पापड व गॅसेसेचा त्रास असेल तर कच्चया भाज्या किंवा कच्ची मोडाची धान्ये टाळावीत. तसेच दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू इ. व्यसने वर्ज्य करावीत. दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यावे. आहारात 2-3 चमचे साजूक तूप असावे. साजूक तूपासंबंधी बरेच गैरसमज आहेत. घरी काढलेल्या लोण्यापासून बनवलेले तूप शरीरातील उष्णता व पिताधिक्य व उष्णता कमी करण्यास मदत करते. अॅनिमिया असल्यास रोज दोन्ही वेळा पालकाचे सूप घ्यावे. काळे मनुके ( 15-20 ) रात्री भिजत घालून सकाळी खावेत. गोडाचा अतिवापर टाळावा. कमकुवत यकृत असल्यास थंड पाणी व थंड पदार्थ टाळावेत. अन्न चावून चावून खावे. अन्न पदार्थात लाळ मिक्स होणे गरजेचे आहे. जेवताना पाणी पिऊ नये. रात्रीचे जेवणही लवकर व हलके घ्यावे. दिवसभर तोंडात काहीतरी टाकणे टाळावे. एकतर शरीरात योग्य प्रमाणात रक्त हवे, हिमोग्लोबिन कमी असेल तर सर्वात प्रथम बळी पडतात ते केस...
👉 घरी बनवा वटजटादी तेल https://youtu.be/FilcaljR9-o👈
रक्ताभिसरण सुधारण्यासाठी डोक्याची मसाज करणे आवश्यक आहे, केसांच्या त्वचेवर दोन्ही हातांची पाचही बोटे दाबणे व नंतर तो दाब तसाच राखून त्वचा गोलाकार फिरवावी. हे करताना त्वचा कवटीपासून वर उचलली जायला हवी. एके ठिकाणी १० वेळा सुलट व उलट दिशेने मसाज केल्यानंतर जागी असा सर्वत्र केसाच्या त्वचेला व्यायाम व्हायला हवा. कमीतकमी ज्या ठिकाणचे केस पातळ आहेत तिथे तरी व्हायला हवा. सर्व ठिकाणी मसाज झाला की एक राऊंड झाला असे दिवसातून 4-5 राऊंडस व्हायला हवेत. सुरवातीचे 15-20 दिवस केस जास्त प्रमाणात जातील. नाहीतरी विकृत केस असेही जाणारच असतात. मात्र आता जातील ते नक्की परत येतील. अजिबात न घाबरता हे व्यायाम करावेत. काहींची सुरूवातीला त्वचा दुखते त्याकडे लक्ष द्यायचे नाही. केसांचे रक्ताभिसरण सुधारण्यास कमीत कमी ३ महिने लागतात. त्यामुळे रिझल्टस दिसण्यासाठी ही ३ महिने लागतात. ज्यांना केसांत खूप घाम येतो त्यांनी वरचेवर (अगदी दिवसातून २ वेळा सुद्धा) डोक्यावरून पाणी घ्यावे, ज्या जागी केस पातळ आहेत तिथेही दिवसातून 2-3 वेळा पाणी लावावे किंवा ओला नॅपकीन ठेवावा (सर्दी असल्यास हे टाळावे) केसांना वाफ किंवा गरम शेक मुळीच करू नये.
Hair fall
Weak hair
Grey hair growing
Ok