रक्तदाब वाढण्याचा विकार मध्यम वयात ४५ ते ६५ वर्षामध्ये होतो. ३५ वर्षाचे खालील माणसांना मात्र रक्तदाब वाढल्याचे फारसे आढळून येत नाही. एखाद्या माणसाचा रक्तदाब वाढला आहे किंवा नाही हे ओळखण्याची पद्धती सांगितली आहे. माणसाचा वरचा रक्तदाब (Systolic Blood Pressure) १५० mm of Hg. पेक्षा अधिक असेल अथवा खालचा रक्तदाब (Diastolic Blood Pressure) 90mm of Hg. पेक्षा अधिक असेल तर ह्या वाढलेल्या रक्तदाबावर उपचार करण्याची गरज आहे असे समजावे.
कारणे –
रक्तनळीचा कठीणपणा हे रक्तदाब वाढण्याचे प्रमुख कारण आहे.
मनोविकार वाढणे,
अतिश्रम,
मूत्रपिंडाचा विकार,
लठ्ठपणा,
अतिभोजन,
मद्यपान,
मधुमेह,
घाईचा आयुष्यक्रम इत्यादी कारणामुळे रक्तदाब वाढतो. रक्तदाब विकाराव अनुवंशिकता देखील कारणीभूत होते. तसेच गर्भारपणाच्या विषविकारांत रक्तदाब वाढतो.
लक्षणे :
रक्तदाब वाढला असता अतिशय थकवा येतो.
झोप येत नाही.
डोके दुखते,
त्याचप्रमाणे डोक्याची मागची बाजूही दुखते.
भोवळ येते.
कधीकधी बेशुद्धीही येते.
आकडी,
ह्रदयात शूळ,
अपचन,
पोटात गुबारा धरणे,
पोट दुखणे,
हृदयात धडधड,
श्वास व शेवटी ह्रदयक्रिया बंद पडणे ही लक्षणे होतात. पण खरे सांगायचे म्हणजे वाढलेला रक्तदाब आपली स्वतःची अशी लक्षणे दाखवीलच अस नाही. त्याच्यापासून सुरुवातीला कसलाच त्रास होत नाही. अनपेक्षितपणेच तो उघड होतो. एखाद्या आजाराबद्दल डॉक्टरला प्रकृती दाखवली असता त्यावेळी रक्तदाब वाढला आहे असे समजून येते. वर वर्णन केलेल्या लक्षणापैकी भोवळं, डोकेदुखी, इत्यादी लक्षणे रक्तदाब वाढल्याने झाली आहेत हे नंतर समजून येते.
आयुर्वेदिक औषधामध्ये-
१) सर्पगंधावटी रोज सकाळी एक गोळी पाण्याबरोबर द्यावी.
२) जटामांसीचूर्ण 500 mg. दिवसातून दोन वेळा पाण्याबरोबर द्यावे.
३) लक्ष्मीविलास रस 125 mg. दिवसातून दोन वेळा द्यावा.
४) पुनर्नवासव प्रत्येक वेळी २ चमचे औषध दिवसातून तीन वेळा द्यावे.
हृदयबलवर्धक वनौषधी
हृदयाला बळकटी आणण्याचे महत्त्वाचे कार्य मुख्यत्त्वे तीन वनस्पती करतात. अर्जुनसाल, अश्वगंध व शतावरी. बऱ्याच जणांना अकारण टेन्शन येते. छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आपण ती गोष्ट वेळेत करू की नाही ? याबद्दल साशंकता निर्माण होते. हे कमजोर हृदयाचे लक्षण आहे. अशा व्यक्तींचे हृदय धडधड करते. छातीत जळजळते, कधी कधी दुखते पण वरील तीन वनौषधींचे समप्रमाणात नियमित सेवन केले असता हृदयाला शक्ती प्रदान होते. हार्ट अॅटॅकनंतर, हार्ट सर्जरीनंतरही ह्या वनौषधींची चुर्णे वापरावीत. परिणाम चांगला होतो. अर्जुनसालीमुळे हृदयाच्या स्नायुंना बळकटी येते. नाडीचा वेग नियमित होतो आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. रोज रात्री १ चमचा दूधातून या अर्जुनसालीचे चूर्ण घ्यावे. कमीत कमी ३ ते ६ महिने घ्यावे. अंगात उष्णता वाढू नये म्हणून भरपूर पाणी प्यावे व आहारातही उष्ण पदार्थ टाळावेत. म्हणजे हृदयाची बळकटी वाढेल.
हृदयरोग असणाऱ्यांनी वरिल पैकी कुठलेही औषध सेवन करताना वैद्याचा सल्ला जरुर घ्यावा.