आमाशयातील द्रवमिश्रीत पदार्थ तोंडावाटे बाहेर पडला तर त्याला ‘ वांती ‘ असे म्हणतात. वांती हा स्वतंत्र रोग नसून कित्येक रोगांत आढळणारे हे एक लक्षण आहे.
१) पित्त वाढल्याने उलट्या होतात.
२) आमाशयाच्या रोगात (अजीर्ण, अग्निमांद्य इत्यादी रोगांत) उलट्या होतात.
३) यकृताच्या रोगात
४) मुत्रपिंडाच्या रोगात
५) मेंदूच्या रोगात
६) गर्भाशयाच्या रोगात उलट्या होतात.
७) कॉलऱ्यामध्ये ओकाऱ्या होतात.
८) स्त्रीयांना गरोदरपणात ओकाऱ्या होतात.
९) समुद्र प्रवासात आणि कोणाकोणाला मोटार प्रवासातही ओकाऱ्या होतात.
१०) ज्वरामध्ये, जंताच्या विकारात आणि विष प्रयोगामुळे ही ओकाऱ्या होतात.
११) आंत्रावरोधासारख्या विकारात शौचाचा नेहमीचा मार्ग बंद झाला तर तोंडातून मळाची उलटी होते. मानसिक विकारामध्ये नुसता एखादा ओंगळवाणा पदार्थ पाहण्याने उलटी होते. तरूण मुलींना होणाऱ्या योषापस्मारात उलटी होते. अर्धशिशी (डोकेदुखी) मध्ये पित्ताने डोके दुखते व वांती होते. वांती होण्यापूर्वी बहुत करून मळमळ होते म्हणून चिकित्सा करीत असताना प्रथम मळमळ व ओकारीच्या कारणाचा शोध घ्यावा. विष प्रयोगापासून वांती होत असेल तर वांती बंद होणारे औषधे देण्याऐवजी आमाशय धुवून रिकामा करावा. पण काही वेळेस वांतीचे कारण न समजले तर काही ठराविक उपचार केले तर फायदा होतो.
घरगुती उपचार
१) सोडावॉटर व लिंबाचे सरबत द्यावे. उलटीच्या योगाने ते पोटात राहत नसेल तर दूध आणि चुन्याची निवळी सम प्रमाणात एकत्र करून पाजावी.
आयुर्वेदिक औषधामध्ये-
१) मयुरपिच्छामसि + अलादी चूर्ण + सूतशेखर प्रत्येकी 100mg. घेवून मधामधून चाटवावे.
२) सुंठ 5gm. साखर 10 gm. दूधामध्ये शिजवून त्याचे चाटण चाटण्यास द्यावे.
३) बृहत्वात चिंतामणी 100mg. मधातून चाटवावे.
४) सुवर्ण सूतशेखर 100mg. मधाचे अनुपानातून द्यावा.
वरील कुठलाही उपाय करण्या अगोदर किंवा दिलेली औषधे तज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावीत.