हाडांमधून कट कट असा आवाज येतो? या 3 गोष्टी खा, लगेच मिळेल आराम…

मेथी दाणे –

मेथीचे सेवन हाडांसाठी फायदेशीर ठरेल. यासाठी आपण रात्री अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा, नंतर सकाळी मेथीचे दाणे चावून खा आणि राहिलेले पाणी पिऊन घ्या. असे नियमित केल्याने हाडांमधून कट कट आवाज थांबण्यास मदत होईल.

दूध प्या –

हाडांमधून कट कट अश्या येणाऱ्या आवाजाचा अर्थ असा देखील होऊ शकतो की त्यांच्यामध्ये सिंग्धतेची कमतरता आहे. ही समस्या वयानुसार वाढते. दैनंदिन आहारातून शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळणे अत्यंत आवश्यक असते. म्हणुन भरपूर दूध प्या. ज्यामुळे अशी समस्या उद्भवणार नाही.

गूळ आणि हरभरा(फुटाने) खा.

भजलेल्या हरभऱ्यासोबत गुळाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गूळ आणि भाजलेले हरभरे दिवसातून एकदा जरूर खा. यामुळे हाडांचा कमकुवतपणा दूर होईल आणि कट कट आवाजही थांबेल. जरी आपल्याला भाजलेले हरभरे खाल्याने गॅसेस चा त्रास असेल तर आपली पचनशक्ती कमकुवत आहे असे समजावे आणि पचनशक्ती मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न करावा…

वरील पैकी उपाय करून आपण हाडातून येणाऱ्या कट कट आवाजापासून सुटका मिळवू शकता. वरील प्रयोग करण्याआधी तज्ञाचा सल्ला नक्की घ्या…

2 thoughts on “हाडांमधून कट कट असा आवाज येतो? या 3 गोष्टी खा, लगेच मिळेल आराम…”

  1. Your articles are very interesting. I am fond of reading them. You get good information on health and various home remedies.
    I would like you to continue with your good work.
    All my best wishes.
    God bless you all.
    Best regards
    Rajgopal

    Reply

Leave a Comment