मानवी शरीरात असलेल्या महत्वाच्या इंद्रियापैकी यकृत हे एक महत्वाचे इंद्रीय आहे. यकृताचे स्थान पोटात उजव्या कुशीत छातीच्या पिंजऱ्याचे खाली असते. आपण सेवन केलेल्या अन्न रसाला येथे पित्ताशी संयोग होऊन त्याला रक्ताचे स्वरूप प्राप्त होते. यकृताकडे इतरही सोपवलेली कामे ही महत्वाची आहेत. शरीरात खेळत असलेल्या रक्तापैकी १/४ रक्त एकट्या यकृतात एकाच वेळी राहात असते. ही एकच गोष्ट त्याचे महत्व पटविण्यास पुरेशी आहे. यकृताचा हृदयाशी, फुफ्फुसाशी व मूत्रपिंडाशी परस्परांना सहाय्य करण्याचा संबंध आहे. अन्नातून कळत वा नकळत जाणाऱ्या विषारी पदार्थाचा नाश करणे हे यकृताचे काम आहे. विषारी पदार्थांचा नाश करताना यकृतावर वाजवीपेक्षा अधिक ताण पडला तर त्यामुळे यकृताचा दाह होतो.
उदाहरणार्थ अतिमद्यपान करणाऱ्यांच्या यकृताला नेहमीपेक्षा अधिक श्रम करावे लागते व त्यामुळे हिपॅटायटीस होतो. यकृताच्या अनेक रोगात ( सांसर्गिक कावीळ, यकृत विद्रधी, यकृताचे कॅन्सर ) मलेरिया, संधीवात या रोगात ही यकृताचा दाह होतो. यकृतामध्ये वाजवीपेक्षा अधिक रक्त अधिक काळ साठून राहिल्याने ही हिपॅटायटीस होतो. दारू प्याल्याने, जड, गरम व मसालेदार पदार्थ खाण्याने यकृताकडे रक्ताचा प्रवाह अधिक होतो. थंडीच्या रोगाने व सर्दीने ही यकृतात रक्ताचा अधिक संचय होतो. मलेरिया व संधिवात या रोगात ही हिपॅटायटीस होण्याची शक्यता असते. हृदयरोगाचा उपद्रव म्हणून यकृतावर सूज येते.
हिपॅटायटीसची लक्षणे
– हिपॅटायटीसमध्ये यकृत मोठे होते. यकृताच्या भागावर दाबले असता दुखते, श्वास घेतल्याने, खोकल्याने अथवा नुसते गिळल्याने तेथे दुखावा अधिक होतो. रोग्याला डाव्या कुशीवर निजवत नाही. यकृताचा भाग फुगलेला दिसतो. ताप येते, डोके दुखते लघवी थोडी व लाल रंगाची होते डोळे थोडे पिवळसर दिसतात. पोटाचे स्नायू टणक व कठीण होतात. उजव्या खांद्यात दुखते, जिभेवर पांढरा थर असतो. ज्वरामध्ये थोडासा चढउतार असतो पण ज्वर पूर्णपणे उतरून जात नाही. रोगी उजव्या कुशीवर अथवा उताणा पडून राहतो.
हिपॅटायटीसवर आहार विहार
– खाण्यापिण्यातील दोष दूर करावेत. ज्यांना पुष्कळ वेळ बसून रहावे लागते त्यांनी मोकळ्या हवेत फिरल्याने रक्तभिसरण चांगले होऊन यकृत हलके होण्यास मदत होते. हलके आणि पातळ अन्न खावे. शौचास साफ होत गेल्याने यकृतातील रक्त संचय कमी होऊन हलके वाटेल यकृतावर गरम पाण्याने शेकावे.
हिपॅटायटीसवर आयुर्वेदिक औषधे
१) कुमारी आसव दर वेळेस १ चमचा दिवसातून तीन वेळा द्यावे.
२) आरोग्य वर्धिनी गोळी प्रत्येक वेळी दोन गोळ्या प्रमाणे दिवसातून तीन वेळा द्याव्या.
३) टॅबलेट लिव्ह -५२ गोळी दिवसातून तीन वेळा द्यावी.
नोट – वरीपैकी कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.