नियम १ :
आपल्या पोटाचे चार भाग करावेत . त्यातील दोन भाग हे आहारासाठी ठेवावेत , एक भाग हा जलासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा , जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो . आहार हा योग्य रीतीने पचला , तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते .
नियम २ :
सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास गरम पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे . लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त , तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो .
नियम ३ :
जेवणाआधी थोडे पाणी प्यावे आणि जेवणाच्या मध्ये मध्ये काही घोट पाण्याचे प्यावेत . त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो.
नियम ४ :
कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगोदर किंवा नंतर घेऊ नये . अस वारंवार केल्यास मळमळणे , वा छातीत जळजळणे सुरू होते , तसेच फळांमधील पोषक तत्वे योग्य प्रमाणात शोषिले जात नाही.
नियम ५ :
अतिशय घाईघाईने अथवा अतिशय हळू जेवू नये . पचनसंस्थेवर विपरीत प्रभाव पडतो .
नियम ६ :
दुपारी जेवणानंतर लगेचच झोपू नये . असे वारंवार केले गेल्यास अवाजवी स्थूलता वाढते आणि पचनही बिघडते .
नियम ७ :
दुपारचे जेवण हे दोन घास जास्त असले तरी चालेल , मात्र रात्रीचे जेवण हे लघू असावे आणि सूर्यास्तापूर्वी ग्रहण करावे . रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनप्रक्रिया मंदावते आणि एक एक व्याधी लक्षणे दिसन येतात .
नियम ८ :
आहार हा ताजा बनवलेला . फ्रिजमधील थंड नसावा . तसेच फ्रिजमधील पाणी आणि बर्फाने शरीरातील उष्णता वाढते .
नियम ९ :
पहिला सेवन केलेला आहार जोपर्यंत पचत नाही , म्हणजेच कडकडून भूक लागत नाही तोवर पुढील आहार घेऊ नये . असे न केल्याने पचनाच्या तक्रारी सुरू होऊन इतर आजारांनादेखील कारणीभूत ठरू शकते.
नियम १० :
प्रत्येक जेवणानंतर अर्धी वाटी ताक प्यावे . त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि खाई खाई होत नाही .
नियम ११ :
रोजच्या आहारामध्ये तूप हे चार चमचे प्रत्येकी घ्यावे . ( केवळ फोडणीपुरते नाही ) तूप हे पाचक अग्नीस प्रदीप्त करते , प्रतिकार शक्ती कायम ठेवते , तसेच ते एक उत्तम रसायनदेखील आहे . शक्यतो गाईचे तूप हे उत्तम , मात्र घरी बनवलेले म्हशीचे तूपदेखील उत्तम असते .
नियम १२ :
दूध आणि फळे एकत्र करून घेऊ नये . जसे फुट कस्टर्ड , शिकरण . असे सवयीने वारंवार खाण्यात आले तर त्वचा रोगनिर्मिती होण्यास कारणीभूत ठरू शकते .
नियम १३ :
अतिकोरडे , अतितेलकट , अतिगरम , अतिशीत , अतिस्निग्ध असा आहार नसावा . सर्व प्रमाणात सेवन केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते . आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला, तर निश्चितच आरोग्य हे उत्तमच राहणार .
वरील प्रयोग करण्याआधी तज्ञाचा सल्ला नक्की घ्या…
Good 👍
Excellent advice
Thanks
खूप छान माहिती दिली आहे।
Thank you very much..!!
Nice information concerning to health
Khóp chan mahiti I will follow
Good information
खुपच चांगली माहित दिली आहे.🙏
खूपच छान!
Valluable information to take care of the health of everyone.
खुप छान माहिती दिलीत थॅक्स अ लॉट