आमाशयव्रण (GASTRIC ULCER)

आम्लपित्ताच्या आजाराकडे दुर्लक्ष झाले तर त्याचे पुढे आमाशयव्रणात रूपांतर होते. आपण खाल्लेले अन्न पखालीसारखा आकार असलेल्या आपल्या आमाशयात जाते. तेथे आमाशयाच्या आकुंचन प्रसरणामुळे घुसळण होते आणि पचनास योग्य असा रांधा तयार होतो. आमाशयात घुसळण चालू असताना आपण खाल्लेल्या अन्नात जर कडक व पचनास कठीण अशी वस्तू असेल तर ती आमाशयाच्या मऊ भिंतीला खरडून जाते व आमाशयाचे मऊ अस्तरावर रेघोट्या पडतात. या रेघोट्यावर जर कडक व कठीण वस्तू वारंवार खरडू लागली तर त्या जागी व्रण पडतो. असा व्रण पाचक रसाचे टप्यात असलेल्या आमाशयाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. व्रणाचे स्थानपरत्वे तीन प्रकार पाडले आहेत.

१) गॅस्ट्रीक अल्सर (Gastric Ulcer)

२) डिओडिनल अल्सर (Duodenal Ulcer)

३) पेप्टीक अल्सर (Peptic Ulcer)

तिन्हीही प्रकारची रोग लक्षणे सारखीच असतात. व्रणाबरोबर वेदना व दुःस्पर्शता असते दुःखने पोटावर समोरच्या भागी आमाशयाच्या भागात असते. ते मागचे बाजूस पाठीकडेही आहे असे वाटते. वेदनांच्या दिशेवरून आमाशयात व्रण कोणत्या ठिकाणी आहे याचा अंदाज घेता येतो. आमाशय व्रणाचे स्थान बेंबीच्या वरचे बाजूस व छातीच्या शिंपल्याचे खालील बाजूस असते. दुःखने स्थानिक असते . पोटाचे नळ ताठल्यासारखे व दोरासारखे कडक लागतात. काही रोग्यात जेवणानंतर १-२ तासाने वांती होते व आमाशयातील व्रणाला बोचणारे कडक अन्नकण वांतीवाटे पडून गेल्याने वांती झाल्यानंतर थोडे बरे वाटते. वांतीमध्ये हायड्रोक्लोरीक अॅसीड अधिक प्रमाणात असल्याने एखादी वेळी रक्तही पडते ते लाल रंगाचे असते, शौचावाटे पठणारे तॉड आंबट पडत. वांतीस आंबट वास येतो. वांतीवाटे आंबट द्रव डांबरी रंगाचे असतो. करपट ढेकरा येतात, पाटात वायू धरतो. व्रणाचे लहान मोठे पणावर पोटाचे कमी अधिक दुखणे व वेदना अवल ठरतो. व्रण मोठा असला व तो पोटाच्या आतच फुटला व आमाशयाला आरपार भोक पडले तर सर्वच चिन्हे तीव्र होतात, पोटात फारच दुखू लागते. पोट लाकडासारखे ताठ होते, घाम सुटतो, रोगी गळून जातो व शेवटी मरण पावतो…

मलावरोध असेल तर शौचासाठी योग्य ती औषधी द्यावी जेणे करून मलावरोध होणार नाही व कोठा साफ होईल. जर रोगाने गंभीर स्वरूप धारण केले तर पोटदुखी बरोबर ओकारी ही होते. कधी कधी ओकारी बरोबर रक्त सुध्दा पडते. जर व्रणामुळे शौचावाटे रक्त पडत असेल आणि मळाचा रंग डांबरासारखा काळा असेल तर आजाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे असे समजावे. म्हणून अल्सरचा उपचार सुरुवातीपासूनच करणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर पुढे व्रणाचे ठिकाणी आरपार भोक पडण्याची व मरण ओढवण्याची शक्यता असते. जर रोगी माणसाने आपल्या आहारावर पूर्ण लक्ष ठेवले तर बहुत करून अल्सर आपोआप बरा होतो. क्रोध, चिंता, आणि घाबरून जाणे या मनोविकारानी अल्सरचा रोग वाढतो. तर मनाची शांती ठेवल्याने विकार कमी होतो.

उपचार- हा रोग बहुत करून औषधोपचाराने बरा होतो. रोग्यास संपूर्ण विश्रांती द्यावी. आरपार भोक पडले तर मात्र ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.

आहार – मऊ व निग्ध आहार द्यावा. सुरुवातीस दुध , तूप , साय , लोणी , ताक द्यावे . व्रण बरा होऊ लागला म्हणजे मग हळूहळू साबुदाना , दुधभाकरी द्यादी आहार ही थोडा थोडा आणि भुकेप्रमाणे द्यावा. अल्सरचे आजारात दुध हे सर्वात चांगले औषध आहे, जर अल्सरने गंभीर स्वरूप धारण केले असेल तर काही दिवसापर्यंत दर तासाला दूध पीत जावे. व्रणाचे स्वरूप थोडे सौम्य झाल्यानंतर मऊ भात, साबुदाना, केळी यासारखे पचनास हलके असलेले अन्न द्यावे. व्रण बरा झाल्यानंतर ही तिखट, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ पचनास कठीण जाणारे पदार्थ आहारात घेऊ नयेत. रात्री झोपताना शक्य असेल तर थोडे दुध पिण्याचा क्रम चालू ठेवावा.

आयुर्वेदिक ओषधामध्ये –

१) भूनिबादिकाय प्रत्येक वेळी चार चमचे दिवसातून दोन वेळा सकाळ संध्याकाळ द्यावा,

२) गुडुच्यादिचूर्ण एक ग्राम मधातून रोग

दोन वेळा द्यावे.

३) सुवर्ण सुतशेखर दर वेळेस एक गोळी दिवसातून दोन वेळा मधातून द्यावी.

मुख्य म्हणजे:

१) द्राक्षादि घृत

२) पिप्पल्यादि घृत

३) पंचतिक्त घृत जेवणानंतर एक एक चमचा दिवसातून दोन वेळा द्यावे.

वरील औषधी आपण तज्ञांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता.

Leave a Comment