अन्न पचनानंतर त्यापासून रस, रक्त, मांस, मेद, इत्यादी जीवनास आवश्यक गोष्टी तयार होतात परंतु अन्न जर पचले नाही तर शरीराचा विकास तर होतच नाही, उलट खाल्लेले अन्न आपल्याला अपाय कारक ठरते, म्हणून अन्नाचे पचन होणे गरजेचे आहे. अन्न प्रमाणशीर सेवन केले तर त्याचे पचन होते. शिळे व पचनास कठीण असे अन्न खाल्ल्याने अजीर्ण होते. अजीर्ण हा एक किरकोळ आजार आहे.
आजाराची लक्षणे:-
ढेकरा येतात,
पोट फुगून येते,
मळमळ सुटते,
अन्न घशाशी येते,
पचण्यापूर्वीच पुनःभरपूर जेवल्याने हा त्रास उधभावतो,पण कधी कधी अजीर्णामध्ये तीव्र व दुःखदायक लक्षणे दिसून येतात. उलट्या व जुलाब होतात. जीभेवर पांढऱ्या रंगाचा थर जमतो. तोंडास सुटते. डोके दुखते, छाती धडधड करते. पोट फुगून येते पोटात दुखते. पोटात वायूमुळे गुड गुड होते, करपट ढेकरा येतात. दुर्गंधयुक्त वायू मलद्वारातून होतात व पोट रिकामे झाले की अजीर्ण कमी होऊन जाते. अजीर्णामुळे मन उदासीन होते.
उपचार- प्रमाणापेक्षा जास्त अन्न खाण्यामुळे अजीर्ण झाले असेल तर उलटी करवी. उलटी आपोआप होत असेल तर ती बंद करू नये. घशात बोटे घातल्याने हि उलटी होते. उलटी न करवली तर लंघन करावे व नंतर हलके अन्न खावे. ताजे ताक, भाताची पेज इत्यादी पातळ पदार्थ प्रथम द्यावेत.
आयुर्वेदिक औषधामध्ये-
१) हिंग्वाष्टक चूर्ण १ चमचा जेवणाच्या पूर्वी घेतल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो व अन्नपचनास मदत होते.
२) भास्करलवण चूर्ण एक चमचाभर ताक, दही अथवा कांजी यांच्याबरोबर दिल्याने अजीर्ण नाहीसे होते.
३) अजीर्नारी रस
४) लशुनादिवटी
५) शंखवटी
६) अग्नितुंडीरस यापैकी कोणत्याही एका औषधाची दरवेळा एक गोळी दिवसातून तीन वेळा पाण्याबरोबर द्यावी.
७) कपार्दिक भस्म 250mg दिवसातून तीन वेळा कोमट पाण्याबरोबर द्यावे.
८) अग्निकुमार रस 250mg दिवसातून तीन वेळा कोमट पाण्याबरोबर द्यावे.
९) व्योषादि चूर्ण 1 ते 3 gm २ वेळा द्यावे.
वरील कुठलाही उपाय करण्या अगोदर किंवा दिलेली औषधे तज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावीत.
Good afternoon,sir/madam,nice, thank you
👍👍👍👍