अचकी/उचकी (Hiccup)

उचकी हे आमाशय विकारातील एक लक्षण आहे. श्वासनलिकेचे तोंड उघडले म्हणजे पोटाचा पडदा व श्वासनलिका यांच्या कार्याची आपसात सुसंगती असावी लागते. श्वासनलिका बंद झाली म्हणजे पोटाचा पडदा सैल होतो. या नेहमीच्या कार्यात व्हेगस नेर्व्ह ( Vagus nerve ) हा ज्ञानतंतू उत्तेजित झाल्यामुळे बिघाड झाला म्हणजे आकुंचित होतो व उचकी लागते.

उचकी का लागते/येत:-

१) पोट फुगल्याने अथवा तिखट किंवा उष्ण पदार्थाने आमाशयाला त्रास झाल्याने उचकी लागते.

२) मधुमेह, कावीळ, अपस्मार, हिस्टेरिया (योषापस्मार) व पोटातील अनेक विकारापासून ही उचकी येणे सुरू होते. स्त्रीला गरोदरपणी जशा ओकाऱ्या होतात तशीच काही स्त्रियांना उचकी ही लागते. आमाशयातील तीव्र आजारात लागलेली उचकी प्राणघातक ठरते.

साधारणपणे उचकी औषधाशिवाय साध्या उपायांनी थांबते .

१) नाक व तोंड बंद करून काही वेळेपर्यंत श्वास कोंडून धरावा व मग हळूहळू सोडावा.

२) पाणी पिण्यास द्यावे व त्याचे मोठे मोठे घोट घेण्यास सांगावे.

३) प्राणायाम करावा म्हणजे एका नाकपुडीतून खोल श्वास घ्यावा व ती बंद करून दुसऱ्या नाकपुडीवाटे सोडावा. पुन्हा दुसऱ्या नाकपुडीने श्वास घेऊन ती बंद करून पहिल्या नाकपुडीवाटे सोडावा असे अनेक वेळा करावे.

४) एखादी गोष्ट सांगून किंवा बोलण्यात गुंतवून मन चाळवावे.

५) नाकात काडी अथवा तपकीर घालून शिंका आणाव्या.(हा उपाय करताना काळजी घ्यावी.)

६) कित्येक जण टोपी अथवा डोक्याचा रुमाल यांचा डोक्याचा घाम आलेली बाजू हुंगतात.

७) मोराच्या पंखाची राख मधातून चाटवावी.

८) मलावरोध असेल तर इनेमा दिल्याने पोट मोकळे होते व उचकी थांबते.

९) जीभ थोडा वेळ पुढे ओढून धरावी.

तसेच उचकीवर शामक औषधाचा चांगला उपयोग होतो.

चिकित्सा : उचकीच्या कारणाचा प्रथम शोध लावावा. बर्फाचे थंड पाणी पिण्यास द्यावे. अजीर्णापासून उचकी सुरू झाली असेल तर घशात बोटे घालून ओकारी करवावी. पोट रिकामे झाल्याने उचकी येणे बंद होऊन जाईल. अजीर्ण रोगावर सांगितलेली औषधे ही उचकीच्या विकारावर उपयोगी पडतात. मलबद्धतेपासून उचकी असेल किंवा उचकी लागणारास मलबद्धता असेल तर साफ पाण्याचा इनेमा करावा. (म्हणजे सुमारे अर्धा लिटर कोमट पाणी इनेमाच्या नळीवाटे गुदद्वारातून पोटात सोडावे.) इनेमामुळे शौचाला होऊन गेल्याने उचकी थांबून जाते.

उचकीवर साधारणपणे शामक औषधांचा वापर करतात. त्यापैकी काही प्रमुख अनुभविक औषधे येथे दिली आहेत. आयुर्वेदिक औषधामध्ये

१) दशमूल क्वाथ प्रत्येक वेळी दोन चमचे दिवसातून तीन वेळा द्यावा.

२) मयूर पिच्छामसि 1gm एक चमचाभर मिसळून दर दोन तासाने चाटवावे.

३) कुटकीचूर्ण 1gm मधाचे चाटवावा.

४) चिलीम अथवा गुडगुडीतून शिलाजित औषधाचा धूर काढावा.

५) गुळ व सुंठ वजनाने समभाग घेऊन त्याचे एकत्र चूर्ण करावे व ते चूर्ण चिमटभर तपकिरीसारखें नाकात ओढावे.

वरील कुठलाही उपाय करण्या अगोदर किंवा दिलेली औषधे तज्ञांचा सल्ला घेऊनच घ्यावीत.

Leave a Comment