मलावरोध / CONSTIPATION

मलबध्दता, बध्दकोष्ठ, कोष्ठबध्दता, मलावरोध हा अतिसारा प्रमाणेच आतड्याचा एक विकार आहे पण अतिसाराच्या अगदी उलट.
अतिसारामध्ये दिवसातून अनेक वेळा शौचास जावे लागते व शौचास पातळ होते. तर मलावरोधात नेहमीच्या सवयीपेक्षा अधिक उशिरा व कष्टाने शौचास होते आणि मळ घट्ट व कठीण झालेला असतो. शौचाला जाण्याचा काळ (दोन शौचाचे मधला काळ) सर्व मनुष्यांचा सारखा असत नाही. साधारणपणे सर्व माणसांना चोवीस तासातून एकदा शौचास होते. पण काही लोकांना दोन दिवसात एक वेळा शौचाला जाण्याची सवय असते. ज्या सवयीने शरीर निरोगी रहात असेल त्यापेक्षा अधिक काळपर्यंत शौचास होत नसेल तर त्याला मलावरोध म्हणतात.

लक्षणे:-


मलावरोधात शौचास खडा झालेला असतो. मलावरोध झाला म्हणजे रोग्यास चैन पडत नाही. पोटात जड झाल्यासारखे वाटते. पोट काहीसे फुगलेले दिसते. भूक लागत नाही. डोके दुखते, आळस येतो, कामाकडे लक्ष लागत नाही. पायांत कळा येतात, मन उद्विग्न होते. छाती धड़धड करते. श्वासाला दुर्गंधी येते जीभेवर पांढरा थर जमतो. मळमळते, बेचैनी असते.

कारणे:-

  • कोरडे अन्न खाल्ल्याने अथवा कमी पाणी पिल्याने शौचास खडा मळ कठीण होतो.
  • वेळेवर शौचास न गेले अथवा शौचास जाण्याची टाळाटाळ संकोच झाला असेल तर अथवा आतड्यात गाठ उठली असेल तर शौचास होतो.
  • घामाच्या किंवा लघवीच्या रूपाने शरीरातील पाणी निघून गेल्यामुळे केली तर नंतर शौचास साफ होत नाही.
  • आंतड्यातील एखाद्या भागाचा होत नाही.
  • म्हातारपणामुळे अथवा इतर कारणानी पोटाचे स्नायु कमजोर झाल्यामुळे पोटात जमलेला मळ खाली मलमार्गात ढकलण्यास जो जोर लागतो तो न मिळाल्यामुळे आतड्याच्या आत मळ साठून राहतो.
  • मलाशयाचे अथवा मलद्वाराचे स्नायू उतार वयात नीट काम करीनासे झाल्याने आतड्यातील मन मलद्वारातून बाहेर पडण्यास त्रास होतो.
  • मुळव्याधीत शौचास वेदना होत असतील तर रोगी शौच दाबून धरतो व त्यामुळे ही मलावरोध होतो.
  • बसून राहणाऱ्या लोकास व बैठे धंदे करणाऱ्या लोकांस शरीरास पुरेशी हवा व व्यायाम मिळत नाही व मलावरोध होतो.
    अशी बरीच कारणे असु शकतात. उपाय
  • नियमित वेळी विशेषतः झोपेतून उठल्यानंतरचे वेळी शौचास जाण्याची सवय ठेवावी. त्यावेळी सुरूवातीचे काही दिवस शौच शुध्दी न झाली तरी चालेल. पण पुरेसा वेळ शौचालयात घालवून शौच शुध्दीचा प्रयत्न करावा, थोडेच दिवसात ठरलेल्या वेळी शौच शुध्दी होत जाईल. शौचालयाचे आजूबाजूस शांतता असावी. इतर मेंबरकडून दारावर खटखट वाजवण्याच्या क्रियेस विरोध करावा.
  • सकाळी तोंड धुतल्यावर व रात्री झोपताना एक पेलाभर थंड पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. सकाळी शौचास जाण्यापूर्वी पेलाभर गरम पाणी अथवा चहा पिले तर आंतड्यांना उत्तेजन मिळते.
  • जेवणात भाजीपाला (विशेषतः पालेभाज्या ) असल्यास शौचास खडा होत नाही.
  • मध, गूळ, तूप, तेल, लोणी इत्यादी गोड व स्निग्ध पदार्थ खाण्यात आले तर शौचास साफ होण्यास मदत होते. रात्री १ चमचाभर तूप घेत जावे.
  • शौचास उत्तेजन येण्यासाठी मोठ्या आतड्याच्या दिशेत पोट चोळावे.
  • सकाळी उठल्यानंतर मोकळ्या हवेत सहलीस जाण्याची सवय ठेवली त्याने मलद्वाराचे स्नायूना उत्तेजन मिळते. औषधोपचार- पोटात साठलेला मळ, शौचाचे वेळी कुंथण्याचा प्रयत्न करूनही बाहेर निघून जात नसेल तर तो बाहेर काढून टाकण्याचे दोन प्रकार आहेत. एनिमाच्या पध्दतीने मळ काढता येतो किंवा औषधे देऊन आपोआप शौर शुध्द करून घेता येते. पोटात साठलेला मळ फारच कठीण झाला असेल तर तो झटपट काढून टाकण्यासाठी वॉटरचा इनेमा करावा.
  • एनिमा करण्याची पध्दती अशी आहे की, सुमारे १ लिटर कोमट पाण्याचा एनिमा दिला जातो. यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत. पाणी इनेमा पात्राच्या नळीवाटे गुदद्वारातून पोटात सोडावे. या पध्दतीने कितीही कठीण मळ असला तरी तो बाहेर निघून येतो. मळ फारच कठीण झाला असेल तर गुदद्वारातून आणखी अधिक पाणी सोडण्याची गरज असते. एखादे वेळी इनेमाची नळी मळात फसून बसते व नळीचे तोंड बंद झाल्यामुळे पाणी पोटात जात नाही. अशा वेळी नळी बाहेर काढून तिचे तोंड मोकळे करावे व परत गुद्वारात बसवून द्यावी. साबणाचे पाणी पोटात गेल्याने मळ पातळ होतो व गुद्वारातून बाहेर पडून जातो. दुसरी एक पध्दती अशी आहे की, ग्लिसरीनच्या पिचकारी (Glycerine Syringe) मध्ये ग्लिसरीन व कोमट पाणी सम प्रमाणात मिसळून ते मिश्रण गुद्द्वारातून पोटात सोडावे.(हा प्रयोग घरी करू नये.) लहान मुलांना व अशक्त झालेल्या माणसांना या उपायाने शौच शुध्दी करता येते. पोटात घेऊन शौचास साफ करणारी अनेक औषधे प्रचारात आली आहेत.

आयुर्वेदिक औषधामध्ये –


१) स्वादिष्ट विरेचन चूर्ण 1gm रात्री कोमट पाण्याबरोबर द्यावे किंवा
२) इसबगोल चूर्ण १ ग्राम रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर द्यावे.
३) त्रिफळा चूर्ण १ ग्राम गरम पाण्यातून झोपताना द्यावे.
४) सुखसारक चूर्ण 1 gm रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर द्यावे.
५) गंधर्वहरितके रात्री झोपताना दोन चमचे कोमट पाण्याबरोबर द्यावे.
६) अविपत्तीकर गोळ्या झोपताना दोन गोळ्या द्याव्या.
७) चित्रक हरितकी दोन चमचे दिवसातून दोन वेळा द्यावे.

सकाळी व्यवस्थित पोट साफ होत नाही, तर करा हे घरगुती उपाय https://youtu.be/UMaASsclIuk

वरील पैकी कुठलेही औषध घेण्या-अगोदर किंवा कुठलाही उपाय करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या…

7 thoughts on “मलावरोध / CONSTIPATION”

Leave a Comment