किडणी


किडणी (मूत्रपिंड) चे रोग आणि चिकित्सा आपण मूत्रपिंड (किडणी- Kidney) किंवा वृक्क याविषयी खूपच थोडे जाणतो. ज्याप्रमाणे नगरपालिका शहर स्वच्छ ठेवते, त्याचप्रमाणे किडण्या शरीरास स्वच्छ ठेवतात. शरीरातील रक्तात असलेली विजातीय व अनावश्यक द्रव्ये आणि कचरा मूत्रमार्गाद्वारे शरीराबाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य किडण्यांद्वारे होते. खरे पाहता किडणी ही रक्ताचे शुद्धिकरण करणारी एक प्रकारची ११ से.मी. लांबीची काजूच्या आकाराची गाळणी आहे, जी पोटाच्या पृष्ठभागात मेरुदंडाच्या दोन्हीकडे स्थित असते. नैसर्गिकदृष्ट्या सुदृढ व सक्षम किडणीत रोज ६० लीटर पाणी गाळण्याची क्षमता असते. साधारणपणे २४ तासात १ ते २ लीटर मूत्र बनवून ती शरीर निरोगी ठेवते. काही कारणास्तव जर एका किडणीने कार्य बंद केले किंवा अपघातात ती गमवावी लागली तर त्या माणसाची दुसरी किडणी पूर्ण कार्यभार सांभाळून शरीरास विषारी होण्यापासून वाचवून निरोगी ठेवते. ज्याप्रमाणे नगरपालिकेच्या निष्काळजीपणा किंवा आळसामुळे शहरात हळूहळू संक्रामक रोग पसरू लागतात, त्याचप्रमाणे किडण्या खराब झाल्यास शरीर अस्वस्थ होते. एका कुशल यंत्रकारागिराप्रमाणे किडणी आपल्या शरीरात कार्य करते. किडणी शरीराचा आवश्यक व क्रियाशील भाग आहे, जो आपल्या शरीर व मनाच्या स्वास्थ्यावर नियंत्रण ठेवतो. किडणी बिघडल्यास रक्त, हृदय, त्वचा व यकृतावर परिणाम होतो.

किडणी रक्तातील शर्करा (Sugar), रक्तकण व उपयोगी आहार-द्रव्य सोडून फक्त अनावश्यक पाणी व द्रव्ये मूत्राच्या रूपात बाहेर फेकते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास ती फक्त अतिरिक्त शर्करेस गाळून मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकते. किडणीचा हृदय, फुप्फुसे, यकृत व प्लीहेशी विशेष संबंध असतो. बहुतांश हृदय व किडणी परस्पर सहयोगाने कार्य करतात, म्हणून ज्यावेळी एखाद्याला हृदयरोग होतो त्यावेळी त्याची किडणीदेखील खराब होते आणि जेव्हा किडणी बिघडते तेव्हा त्या माणसाचा रक्तदाब उच्च होतो व हळूहळू हृदयदेखील दुर्बल होते. आयुर्वेदाचे निष्णात वैद्य म्हणतात की किडणीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे याचे मुख्य कारण आजकाल समाजात हृदयरोग, दमा, क्षयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या रोगांच्या उपचारासाठी केले जाणारे इंग्रजी औषधांचे दीर्घकाळपर्यंत किंवा आजीवन सेवन आहे. या इंग्रजी औषधांच्या विषारी प्रभावामुळेच किडणी व लघवीसंबंधी रोग जडतात.

कधी कधी एखादे आधुनिक औषध अल्पकाळ घेतल्याने विनाशकारी प्रतिक्रियेच्या (Reaction) रूपात ‘ किडणी फेल्युअर ‘ (Kidney Failure) सारखे गंभीर रोग होताना दिसतात. म्हणून रुग्णांना आमचा सल्ला आहे की त्यांच्या कोणत्याही आजारात शक्य होईल तेवढे निर्दोष वनस्पतींपासून निर्मित व विपरीत आणि परिवर्ती परिणामाने (Side Effect and After Effect) रहित आयुर्वेदिक औषध घेण्याचाच आग्रह ठेवावा. स्वतः आधुनिक अॅलोपॅथीचे डॉक्टरदेखील त्यांच्या अथवा त्यांच्या संबंधितांच्या उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांचाच आग्रह ठेवतात. आधुनिक विज्ञानानुसार, किडणी अस्थि मज्जा (Bone Marrow) बनविण्याचे कार्यदेखील करते. यावरून हेदेखील सिद्ध होते की आजकाल रक्ताच्या कॅन्सरच्या व्यापकतेला आधुनिक औषधांचा विपरीत व परिवर्ती परिणामच कारणीभूत आहे.

किडणीच्या विकृतीची कारणे :

आधुनिक काळात वाटाणे, शेंगा इ . द्विदल प्रोटीनयुक्त आहाराचे अधिक सेवन, मैदा, साखर व बेकरीच्या पदार्थांचा अधिक वापर, चहा – कॉफीसारखे उत्तेजक पेय, दारू व थंड पेये, आधुनिक विषारी औषधे अशुद्ध आहाराचे किंवा मादक पदार्थांचे अधिक सेवन, औपसर्गिक प्रमेह (गोनेरिया), उपदंश (सिफलिस) सारखे लैंगिक रोग, त्वचेची अस्वच्छता व त्वचेचे रोग, जीवनशक्ती रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव, आतड्यांतील संचित मल, शारीरिक परिश्रमाचा अभाव अथवा अत्याधिक शारीरिक वा मानसिक श्रम, अशुद्ध औषधे व अयोग्य जीवन, उच्च रक्तदाब व हृदयरोगांवर दीर्घकाळ केले जाणारे औषधांचे सेवन, आयुर्वेदिक परंतु अशुद्ध पाऱ्यापासून बनविलेल्या औषधांचे सेवन, आधुनिक मूत्रल (Diuretic) औषधांचे सेवन, तंबाखू वा ड्रग्ज सेवनाची सवय, दही, तीळ, नवा गूळ, मिठाई, वनस्पती तूप, श्रीखंड, मांसाहार, फ्रूट ज्यूस, चिंच, टोमॅटो केचअप, आंबट पदार्थ, कैरी, लोणचे इ. यांचा अतिरेक हे सर्व किडणीच्या विकृतीची कारणे आहेत.

किडणी निकामी होण्याची सामान्य लक्षणे:

आधुनिक विज्ञानानुसार :
१) डोळ्यांच्या खालील पापण्या सुजलेल्या, पाणावलेल्या व जड दिसतात.
२) जीवनातील चैतन्य, स्फूर्ती व उत्साह कमी होतो.
३) सकाळी अंथरुणातून उठताना स्फूर्तीऐवजी आळस, थकवा, अस्वस्थता वाटते.
४) थोड्याशा श्रमानेच थकवा जाणवतो.
५) श्वास घेताना कधी कधी त्रास होऊ लागतो.
६) अशक्तपणा जाणवतो.
७) भूक मंदावते.
८) डोके दुखू लागते व चक्कर येऊ लागते.
९) अनेकांचे वजन कमी होते.
१०) अनेकांच्या पायावर अथवा शरीराच्या इतर अवयवांवर सूज येते, कधी जलोदर होतो तर कधी उलटी होते किंवा मळमळल्यासारखे वाटते.
११) रक्तदाब उच्च होतो.
१२) लघवीत अॅल्ब्यूमिन आढळून येते.

आयुर्वेदानुसार :
साधारणपणे शरीराच्या कोणत्याही भागावर अचानक सूज येणे, सर्वांगात वेदना होणे, ताप, डोकेदुखी, उलट्या, रक्ताल्पता, पांडुरोग, मंदाग्नी, घाम न येणे, त्वचा रूक्ष होणे, नाडी जलद गतीने चालणे, उच्च रक्तदाब, पोटात किडणीच्या जागेवर दाबल्यास त्रास होणे, बहुधा अल्प प्रमाणात जळजळ व वेदनेसह थेंब-थेंब उष्ण लघवी होणे, हात-पाय थंड पडणे, अनिद्रा, यकृत व प्लीहेचा त्रास, कर्णनाद, डोळ्यांमधील विकृती, कधी मूर्च्छा तर कधी उलटी होणे, अम्लपित्त, ध्वजभंग (नपुंसकता), डोके व मानेत त्रास होणे, भूक न लागणे, खूप तहान लागणे, मलावरोध होणे यासारखी लक्षणे दिसतात.
ही सर्व लक्षणे सर्व रुग्णांमध्ये आढळतीलच हे जरूरीचे नाही.

किडणीच्या त्रासामुळे होणारे अन्य रोग :

किडणीचा त्रास जास्त काळ राहिल्यास रुग्णास दमा, हृदयकंप, न्यूमोनिया, प्ल्युरसी, जलोदर, खोकला, हृदयरोग, यकृत व प्लीहेचा त्रास, मूर्च्छा आणि शेवटी मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अशा रुग्णांमध्ये हा त्रास रात्रीच्या वेळी अधिकच वाढतो. सध्यातरी अॅलोपॅथीत किडणीच्या रोगावर सोपा व सुलभ उपचार उपलब्ध नसून आयुर्वेदात मात्र याचा सचोट, सोपा व सुलभ उपाय उपलब्ध आहे.

वाचा किडनी रोगात आयुर्वेद काय म्हणते👇

https://ayurvedafitnesstips.com/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%9a/

आहार :

सुरुवातीस रुग्णाला ३-४ दिवस उपवास करायला सांगावा अथवा मूग किंवा जवाच्या पाण्यावर ठेवून हलका व अल्पाहार द्यावा. आहारात मीठ देऊ नये किंवा अत्यल्प द्यावे. लिंबाच्या सरबतात मध किंवा ग्लुकोज टाकून १५ दिवस देऊ शकता. तांदळाची पातळ खीर किंवा पेज देऊ शकता. मग हळूहळू जसजसे यूरियाचे प्रमाण कमी होत जाईल तसतसे पोळी, भाजी, गव्हाची लापशी (सोजी) इ . देऊ शकता. रुग्णाला मुगाचे पाणी, शेवग्याचे सूप, धमासा किंवा गोखरूचे पाणी अथवा काढा (गोखरूचे २ चमचे चूर्ण १ ग्लास पाण्यात ६ ते ८ तास भिजवून, गाळून घ्यावे) हवे तेवढे पाजू शकता. परंतु फुप्फुसात पाण्याचा संचय झाला असल्यास पाणी अधिक न देता पाण्याचे प्रमाण कमी करावे. तसेच दिवसभरात पाणी किती द्यावे हे रुग्णाच्या किडणी समस्या वर अवलंबून आहे. रुग्णास दारू, मांस, मासे, अंडी, कॉफी, हिंग, मिरची, लोणचे, पापड, फळे, पेढे, मिठाई, पनीर, चटपटीत पदार्थ, शेंगा, वाटाणे, राजमा, बेकरीचे व फ्रिजमधील पदार्थ अजिबात देऊ नयेत.

विहार :

किडणीच्या रुग्णास भरपूर आराम आवश्यक आहे. सूज अधिक असल्यास अथवा यूरेमिया किंवा मूत्रविषाची लक्षणे दिसू लागताच रुग्णास संपूर्ण विश्रांती (Complete bed rest) घेणे आवश्यक आहे. रुग्णाला थोड्या उष्ण व कोरड्या वातावरणात ठेवावे. शक्यतो पंख्याच्या हवेपासून दूर ठेवावे. तीव्र वेदनेत गरम कपडे घालावेत. गरम पाण्यानेच अंघोळ घालावी. थोडे कोमट पाणी पाजावे.

औषधोपचार :

किडणीच्या रुग्णासाठी कफ व वायूचा नाश करणारी चिकित्सा लाभदायक आहे.
उदा.- स्वेदन, बाष्पसेवन (Steam – bath), गरम पाण्याने कटिस्नान (Tub – bath). रुग्णाला आधुनिक तीव्र मूत्रल औषधे देऊ नयेत, कारण दीर्घ काळानंतर त्याच्यामुळे किडण्या खराब होतात. त्यापेक्षा जर लघवीत साखर येत असेल किंवा लघवी कमी होत असेल तर लिंबाचा रस, श्वेत पर्पटी, चंद्रप्रभा, शिलाजित इ. निर्दोष औषधांचा उपयोग केला पाहिजे. गंभीर स्थितीत रक्त मोक्षण (दूषित रक्त काढून टाकणे) खूप लाभदायक आहे; परंतु ही चिकित्सा रुग्णास इस्पितळातच दिली पाहिजे. सहजगत्या उपलब्ध असलेल्या पुनर्नवा (घेटूळी) च्या रसात मिरपूड किंवा त्रिकटू चूर्ण टाकून प्यावे. कुळथाचा काढा किंवा सूप प्यावे. रोज १०० ते २०० ग्रॅम गोमूत्र घ्यावे. पुनर्नवादी मंडूर, दशमूळ क्वाथ, पुनर्नवारिष्ट, दशमूलारिष्ट, गोक्षुरादी क्वाथ, गोक्षुरादी गुग्गळ, जीवित प्रदावटी इ. चा उपयोग लक्षणे व रुग्णाची स्थिती पाहून केला पाहिजे. यासाठी वैद्यकिय सल्ला अत्यावश्यक आहे. दररोज १-२ प्याले लोहचुंबकीय जल (Magnetic water) प्यायल्याने किडणीच्या रोगात लाभ होतो…

वरील माहिती ही फक्त माहिती म्हणून असून दिलेली औषधे किंवा कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Comment