निसर्गाचा समतोल आणि वनौषधी ची उपयुक्तता
वनौषधी आणि प्राणी मात्रांच्या जाती नष्ट होऊ लागल्या अनेक वनस्पतींमध्ये विलक्षण औषधी गुणधर्म असतात हे तुम्हाला माहित आहेच. सध्याच्या युगात अॅलोपथीने कॅन्सर, एडस्, सोरॅसेस, कुष्ठरोग यासारख्या रोगांवर उपचार तर शोधले आहेत परंतु त्यांचे आधुनिक तंत्र व औषधांचे भयानक साइड इफेक्टस होऊ लागले. त्यामुळे सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे रोग तर पूर्वीच्या काळीही कोणत्या ना कोणत्या रूपात असतीलच मग त्यावर आयुर्वेदिय उपचार होतच असणार. हे लक्षात आल्यावर अनेकांनी आपला मोहरा पुन्हा पारंपारिक औषधांकडे वळविला आहे. निसर्गात अनेक गोष्टी आहेत. ज्या आपल्याला उपयुक्त आहेत.
उदा. द्यायचे झाले तर पावसाळ्यात डराव डराव करणारा बेडूक. हल्ली दिसतो का हो आपल्या आसपास ? तो एवढा दुर्मिळ का व्हावा ? तर आपण अति करन्सींच्या लोभापोटी युरोपियनांना हवे ते ‘ पेटंट्स ‘ देऊ लागलो. त्यामुळेच बेडकांच्या जाती दुर्मिळ झाल्या. पावसाचा संदेश देणारा बेडूकच गायब झाला. याला कारण युरोपातील काही लोकांचे बेडूक हे चविष्ट खाद्य आहे. विशेषतः बेडकांच्या पायांना चांगलीच मागणी आहे. म्हणून तर भारताने परकीय चलनाच्या आशेने बेडकांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली. विशेषतः बंगालमधून बेडकांची प्रचंड निर्यात झाली. त्यामुळे शेता मधील पाणथळीत वावरणारे बेडूक हळूहळू नष्ट होत गेले. त्याच बरोबर बेडकांचे खाद्य असलेल्या कृमी कीटकांनी शेतीच्या पिकांचा फन्ना उडवायला सुरूवात केली. त्यामुळे भाजीपाला पिकांवर जास्त प्रमाणात रासायनिक द्रव्यांचे फवारे होऊ लागले. पर्यायाने कृमी कीटकांना नष्ट करण्यासाठी प्रचंड प्रमाणात डी.डी.टी वापरण्यात आली त्यावर जास्त पैसा खर्च करावा लागला. मग शासनाने बेडकांच्या निर्यातीवर बंदी हुकूम जारी केला. या गोष्टीचे तात्पर्य इतकेच की, प्राणीमात्रांच्या जाती नष्ट झाल्या की त्यांनी राखलेल्या निर्सगाचा समतोल ढासळतो आणि त्याचे दुष्परिणाम मानवालाच भोगावे लागतात.
म्हणूनच याचा विचार करून आपण वनौषधी लागवडीकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच जे निसर्गाने निर्माण केले आहे त्याची तोडफोड न करता ते जतन केले पाहिजे. रस, वीर्य आणि औषधी गुण कायम ठेवणाऱ्या दिव्य वनौषधींना संरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी जागोजागी वनौषधी उद्याने झाली पाहिजेत. त्या दृष्टीने सर्वांनी जागरूक होऊन कार्य केले पाहिजे. विकारांवर विजय वनौषधींमुळे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आदि विकांरावर विजय मिळविण्यासाठी वनौषधी उपयुक्त आहे. आपले मन एकाग्र करण्यासाठी काही वनौषधी उपयोगी पडतात. म्हणजेच आपला मरगळलेला चेहरा ताजातवाना करण्यासाठी वनौषधींना आपलेसे करा. तोंडाला चव नाही, डोकेदुखी, कंबरदुखी, चक्कर यासारख्या दुर्लक्षित छोट्या आजारांवर वनौषधींची मात्रा लागू पडते.
निसर्गाचा समतोल राखला पाहिजे, जर समतोल राखला नाही तर मात्र न भरून निघणारे नुकसान होईल…
Good & informative article .