अगदी सोपे अन् घरगुती…
१. ताजे आल्याचे छोटे छोटे एक दोन तुकडे तोंडात धरले असता उचकी लगेच थांबते.
२. ६ ग्रॅम बेहडा चूर्ण, ६ ग्रॅम मध एकत्र करून जर खूपच सारखी सारखी उचकी लागत असेल तर दोन तासाच्या अंतराने हे चूर्ण चाटावे.
३. काही वेळा वातप्रकोपानेही उचकी लागते. अशा वेळी सुंठ, पिंपळ व आवळकाठी या सर्वांचे चूर्ण समप्रमाणात घेऊन ते क्विंचीत चाटावे.
४. १ चमचा ( छोटा ) तुळशीच्या रसात, अर्धा छोटा चमचा मध घालून मिश्रण चाटले असता उचकी थांबते.
५. गाईच्या शुद्ध तूपात क्विंचित मिश्री घालून चाटले असता, उचकी थांबते.
६. अपचनाने येणाऱ्या उचकीवर मिरी जाळून तिचा धूर हुंगावा.
७. सुकलेल्या मूळ्याचे तुकडे पाण्यात टाकून उकळून काढा करावा व तो प्यावा, अर्धा फुलपात्र पाणी व तुकडे, सतत चमच्याने हलवून अर्धा आठवावा चोथा काढून हा काढा प्यावा.
८. पिंपळाचे चूर्ण व मिश्री समप्रमाणात घेऊन हुंगली असताही उचकी थांबते.
९. मूळ्याची पाने चावून खा म्हणजे उचकी लगेच थांबेल.
१०. सुंठीचे क्वाथ करताना १ भाग शुष्क किंवा आर्द्र घटक व २ भाग पाणी घेऊन आर्धा भाग उरवावा मग त्यात आलेरस घालून किंचित मिश्री टाकून नस्य करावे ( २ थेंब ) त्यामुळे जास्त जोराने येणारी उचकी थांबते. ११. छोटा वेलदोडा तोंडात धरा अन् पहा उचकी थांबते की नाही .
१२. पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन तोंडात धरली असता उचकी लगेचच थांबते.
१३. बडिशेप दाताने चावून खा मग लगेच उचकी थांबेल.
१४. लहान मुलांना उचकी लागली की त्यांची भूक वाढली समजून किंचित मध चाटवावा.
१५. थोडी साखर खावी म्हणजे उचकी जाईल.
१६. दीर्घ श्वनानेही उचकी थांबते.
वरीलपैकी कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ञांचा सल्ला घ्या.