मलावरोध / CONSTIPATION

मलबध्दता, बध्दकोष्ठ, कोष्ठबध्दता, मलावरोध हा अतिसारा प्रमाणेच आतड्याचा एक विकार आहे पण अतिसाराच्या अगदी उलट.अतिसारामध्ये दिवसातून अनेक वेळा शौचास जावे लागते व शौचास पातळ होते. तर मलावरोधात नेहमीच्या सवयीपेक्षा अधिक उशिरा व कष्टाने शौचास होते आणि मळ घट्ट व कठीण झालेला असतो. शौचाला जाण्याचा काळ (दोन शौचाचे मधला काळ) सर्व मनुष्यांचा सारखा असत नाही. साधारणपणे … Read more

शिवाम्बू उपचार पद्धती

चिकित्सा आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या विष – द्रव्यांशी लढून, त्यांना शरीराबाहेर टाकून देण्यासाठी शरीरातच प्रतिद्रव्ये तयार करण्याची निसर्गाची योजना आता पाश्चात्य देशांतील डॉक्टरांनादेखील मान्य झालेली आहे. माणसाला लागणारी जरूर तेवढी औषधीद्रव्ये रात्रीच्या वेळी शरीरात तयार होत असतात. मानवी शरीरातील संगणक नियमितपणे हे कार्य पार पाडत असतो. रात्री तयार झालेली ही सर्व द्रव्ये माणसाच्या सकाळच्या पहिल्या … Read more

अतिसार/हगवण (Diarrhoea)

पातळ शौचास होत असेल तेव्हा त्या माणसास ‘अतिसार’ झाला अस म्हणतात. जेव्हा एखाद्या माणसाला नेहमीपेक्षा अधिक वेळा आणि द्रवमिश्रीत मलाचे शौचाबरोबर आंव आणि रक्त पडत असेल तर त्या आजाराला ‘संग्रहणी’ असे म्हणतात. अतिसार (डायरिया) व संग्रहणी (डिसेंटरी) मध्ये फरक असा आहे. की, अतिसारामध्ये नुसतेच द्रवमिश्रीत मळाचे शौचास होते. शौचाचे वेळी कुंथावे लागत नाही. तर संग्रहणीमध्ये … Read more

आमाशयाचा दाह (Gastritis)

आमाशय दाह (गॅस्ट्रायटीस) हा रोग गॅस्ट्रो या रोगापासून अगदी भिन्न आहे, गॅस्ट्रो हा सांसर्गिक (एकापासून दुसऱ्याला होणारा) रोग असून त्याच्या साथी येत असतात. आमाशय दाह व गॅस्ट्रो या रोगांच्या उपचारातही फरक आहे. अतिशय तिखट अथवा पचण्यास अयोग्य असे पदार्थ खाल्ल्याने आमाशयाचा दाह होतो. रोगामुळे अशक्त झालेल्या आमाशयाची पचन शक्ती क्षीण झालेली असते अशा स्थितीत पचनास … Read more

अजीर्ण (INDIGESTION)

अन्न पचनानंतर त्यापासून रस, रक्त, मांस, मेद, इत्यादी जीवनास आवश्यक गोष्टी तयार होतात परंतु अन्न जर पचले नाही तर शरीराचा विकास तर होतच नाही, उलट खाल्लेले अन्न आपल्याला अपाय कारक ठरते, म्हणून अन्नाचे पचन होणे गरजेचे आहे. अन्न प्रमाणशीर सेवन केले तर त्याचे पचन होते. शिळे व पचनास कठीण असे अन्न खाल्ल्याने अजीर्ण होते. अजीर्ण … Read more

अचकी/उचकी (Hiccup)

उचकी हे आमाशय विकारातील एक लक्षण आहे. श्वासनलिकेचे तोंड उघडले म्हणजे पोटाचा पडदा व श्वासनलिका यांच्या कार्याची आपसात सुसंगती असावी लागते. श्वासनलिका बंद झाली म्हणजे पोटाचा पडदा सैल होतो. या नेहमीच्या कार्यात व्हेगस नेर्व्ह ( Vagus nerve ) हा ज्ञानतंतू उत्तेजित झाल्यामुळे बिघाड झाला म्हणजे आकुंचित होतो व उचकी लागते. उचकी का लागते/येत:- १) पोट … Read more

वांती (Vomiting) उलटी/ओकारी

आमाशयातील द्रवमिश्रीत पदार्थ तोंडावाटे बाहेर पडला तर त्याला ‘ वांती ‘ असे म्हणतात. वांती हा स्वतंत्र रोग नसून कित्येक रोगांत आढळणारे हे एक लक्षण आहे. १) पित्त वाढल्याने उलट्या होतात. २) आमाशयाच्या रोगात (अजीर्ण, अग्निमांद्य इत्यादी रोगांत) उलट्या होतात. ३) यकृताच्या रोगात ४) मुत्रपिंडाच्या रोगात ५) मेंदूच्या रोगात ६) गर्भाशयाच्या रोगात उलट्या होतात. ७) कॉलऱ्यामध्ये … Read more

कृमी, जंत (Worms)

पोटातील आतड्यात ज्या कृमी होतात त्यास जंत असे म्हणतात. बहुत करून लहान मुलांच्या पोटात जंताचा विकार होतो. निदान – मळावाटे एखादा जंत पडणे हेच पोटात जंत झाल्याचे खात्रीचे लक्षण समजावे. इतर लक्षणामध्ये मुलांच्या पोटात दुखते पोट काहीसे मोठे व फुगून आलेले दिसते. केव्हा केव्हा मूल खा खा करते परंतु अन्न नीट पचत नाही. जुलाब होतात … Read more

पोटशूळ (Colic)

पोटशूळ म्हणजे पोटात दुखणे. पोटशूळ अनेक कारणांमुळे सुरू होऊ शकते ते खालील प्रमाणे… १) वातुळ पदार्थ (पोटात वायू धरणारे पदार्थ खाल्ल्याने पोट दुखते) २) मलावरोध झाल्यानेही पोट दुखते. ३) थंडीमुळे पोट दुखते. ४) जंतामुळे ही पोट दुखते. ५) धास्ती, भिती, चिंता इत्यादी मानसिक कारणाने पोट दुखते. ६) आंतड्याच्या आतील बाजूच्या स्नायू संकोचाने पोट दुखते. ७) … Read more

अग्निमांद्य (DYSPEPSIA)

साधारणपणे प्रौढ माणसास जडणारा हा आजार आहे. पुष्कळ दिवसापर्यत एकसारखे अजीर्ण होत राहिल्यास अग्निमांद्याचा विकार जडतो. चहा, कॉफी, तंबाखु किंवा मद्य यांचे अतिसेवन करणे किंवा पचनास जड असलेले अन्न रोजचा आहारात समाविष्ट होणे या कारणाने भूक मंदावते व अग्निमांद्याचा विकार होतो. अग्निमांद्यामध्ये तोंडास चव नसते. जठर रस कमी प्रमाणात सुटतो. त्यामुळे बरेचसे अन्न पचन न … Read more