Malaria

मलेरिया थंडीताप, हिवताप मलेरिया हा सर्व लोकांच्या परिचयाचा रोग आहे. या आजारातील थंडी व ताप या दोन प्रमुख लक्षणावरून ‘थंडीताप’ अथवा ‘हिवताप’ ही नावे या आजारास पडली आहेत. या आजारात प्रथम थंडी नंतर ताप व शेवटी घाम असा क्रम असल्याने तो चटकन ओळखणे सोपे जाते. डासांच्या मार्फत या आजाराच्या १) प्लाजमोडियम व्हायव्हॅक्स २) प्लाजमोडियम फाल्सीपेरम … Read more

मुतखडा

मूत्रामध्ये जो खडा बनतो त्यास मूतखडा असे म्हणतात. लघवीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढले म्हणजे क्षार एकमेकास चिकटून त्यांचा खडा बनतो. सुरुवातीस तो वाळू अथवा रेतीच्या स्वरूपात असतो. हळू हळू थरावरथर जमून तो मोठा होतो लहान रेतीच्या स्वरूपात असतो तो पर्यंत लघवीवाटे बाहेर पडण्यास अडचण पडत नाही. एकदा का तो मोठा झाला म्हणजे मूत्र मार्गातून बाहेर पडणे … Read more

किडणी

किडणी (मूत्रपिंड) चे रोग आणि चिकित्सा आपण मूत्रपिंड (किडणी- Kidney) किंवा वृक्क याविषयी खूपच थोडे जाणतो. ज्याप्रमाणे नगरपालिका शहर स्वच्छ ठेवते, त्याचप्रमाणे किडण्या शरीरास स्वच्छ ठेवतात. शरीरातील रक्तात असलेली विजातीय व अनावश्यक द्रव्ये आणि कचरा मूत्रमार्गाद्वारे शरीराबाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य किडण्यांद्वारे होते. खरे पाहता किडणी ही रक्ताचे शुद्धिकरण करणारी एक प्रकारची ११ से.मी. लांबीची काजूच्या … Read more

मुत्रपिंडाचे रोग (किडनीचे रोग)

मूत्रपिंडाचे (किडनीचे) स्थान पाठीमागच्या बाजूस खालच्या फासळीच्या आतल्या बाजूस आहे. मूत्रपिंडाचा आजार हा जलोदर, हृदयाचे रोग, पांडुरोग यासारख्या भयंकर रोगाचे मूळ कारण असणारा हा रोग आहे. मूत्रपिंडाच्या रोगात लघवीमधून अल्ब्युमिन नावाचा रक्तातील महत्वाचा पोषक घटक निघून जातो. त्याचप्रमाणे लघवीतून रक्त आणि मुत्रनळाच्या खरपुड्या बाहेर पडतात. मूत्रपिंडाच्या आजाराची दुसरी महत्वाची खूण म्हणजे अंगावर सूज येऊ लागते. … Read more

आयुर्वेदानुसार ताकाचे किती प्रकार व कुठल्या आजारात कुठले ताक प्यावे…

ताकाचे प्रकार खालील प्रमाणे:-१ दधिमण्ड२ मथित (मट्ठा)३ तक्र४ उद्भिवत५ छच्छिका (ताक) याप्रकारे ताकाचे पाच प्रकार पाडण्यात येतात, तसेच त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्माप्रमाणे वेगवेगळ्या रोगांवर त्यांचा उपयोग केला जातो. १ दधिमण्ड:-दह्यात पाणी घातल्याशिवाय जे ताक हलवले जाते त्या ताकाला ‘ दधिमण्ड ‘ म्हणतात. हे ताक ग्राही, मळ रोखणारे, दीपक, पाचक व शीतल असते. ते वायुनाशक पण कफवर्धक … Read more

मलावरोध / CONSTIPATION

मलबध्दता, बध्दकोष्ठ, कोष्ठबध्दता, मलावरोध हा अतिसारा प्रमाणेच आतड्याचा एक विकार आहे पण अतिसाराच्या अगदी उलट.अतिसारामध्ये दिवसातून अनेक वेळा शौचास जावे लागते व शौचास पातळ होते. तर मलावरोधात नेहमीच्या सवयीपेक्षा अधिक उशिरा व कष्टाने शौचास होते आणि मळ घट्ट व कठीण झालेला असतो. शौचाला जाण्याचा काळ (दोन शौचाचे मधला काळ) सर्व मनुष्यांचा सारखा असत नाही. साधारणपणे … Read more

अतिसार/हगवण (Diarrhoea)

पातळ शौचास होत असेल तेव्हा त्या माणसास ‘अतिसार’ झाला अस म्हणतात. जेव्हा एखाद्या माणसाला नेहमीपेक्षा अधिक वेळा आणि द्रवमिश्रीत मलाचे शौचाबरोबर आंव आणि रक्त पडत असेल तर त्या आजाराला ‘संग्रहणी’ असे म्हणतात. अतिसार (डायरिया) व संग्रहणी (डिसेंटरी) मध्ये फरक असा आहे. की, अतिसारामध्ये नुसतेच द्रवमिश्रीत मळाचे शौचास होते. शौचाचे वेळी कुंथावे लागत नाही. तर संग्रहणीमध्ये … Read more

आमाशयाचा दाह (Gastritis)

आमाशय दाह (गॅस्ट्रायटीस) हा रोग गॅस्ट्रो या रोगापासून अगदी भिन्न आहे, गॅस्ट्रो हा सांसर्गिक (एकापासून दुसऱ्याला होणारा) रोग असून त्याच्या साथी येत असतात. आमाशय दाह व गॅस्ट्रो या रोगांच्या उपचारातही फरक आहे. अतिशय तिखट अथवा पचण्यास अयोग्य असे पदार्थ खाल्ल्याने आमाशयाचा दाह होतो. रोगामुळे अशक्त झालेल्या आमाशयाची पचन शक्ती क्षीण झालेली असते अशा स्थितीत पचनास … Read more

अजीर्ण (INDIGESTION)

अन्न पचनानंतर त्यापासून रस, रक्त, मांस, मेद, इत्यादी जीवनास आवश्यक गोष्टी तयार होतात परंतु अन्न जर पचले नाही तर शरीराचा विकास तर होतच नाही, उलट खाल्लेले अन्न आपल्याला अपाय कारक ठरते, म्हणून अन्नाचे पचन होणे गरजेचे आहे. अन्न प्रमाणशीर सेवन केले तर त्याचे पचन होते. शिळे व पचनास कठीण असे अन्न खाल्ल्याने अजीर्ण होते. अजीर्ण … Read more

अचकी/उचकी (Hiccup)

उचकी हे आमाशय विकारातील एक लक्षण आहे. श्वासनलिकेचे तोंड उघडले म्हणजे पोटाचा पडदा व श्वासनलिका यांच्या कार्याची आपसात सुसंगती असावी लागते. श्वासनलिका बंद झाली म्हणजे पोटाचा पडदा सैल होतो. या नेहमीच्या कार्यात व्हेगस नेर्व्ह ( Vagus nerve ) हा ज्ञानतंतू उत्तेजित झाल्यामुळे बिघाड झाला म्हणजे आकुंचित होतो व उचकी लागते. उचकी का लागते/येत:- १) पोट … Read more