आमाशयाचा दाह (Gastritis)

आमाशय दाह (गॅस्ट्रायटीस) हा रोग गॅस्ट्रो या रोगापासून अगदी भिन्न आहे, गॅस्ट्रो हा सांसर्गिक (एकापासून दुसऱ्याला होणारा) रोग असून त्याच्या साथी येत असतात. आमाशय दाह व गॅस्ट्रो या रोगांच्या उपचारातही फरक आहे. अतिशय तिखट अथवा पचण्यास अयोग्य असे पदार्थ खाल्ल्याने आमाशयाचा दाह होतो. रोगामुळे अशक्त झालेल्या आमाशयाची पचन शक्ती क्षीण झालेली असते अशा स्थितीत पचनास … Read more

अजीर्ण (INDIGESTION)

अन्न पचनानंतर त्यापासून रस, रक्त, मांस, मेद, इत्यादी जीवनास आवश्यक गोष्टी तयार होतात परंतु अन्न जर पचले नाही तर शरीराचा विकास तर होतच नाही, उलट खाल्लेले अन्न आपल्याला अपाय कारक ठरते, म्हणून अन्नाचे पचन होणे गरजेचे आहे. अन्न प्रमाणशीर सेवन केले तर त्याचे पचन होते. शिळे व पचनास कठीण असे अन्न खाल्ल्याने अजीर्ण होते. अजीर्ण … Read more

अचकी/उचकी (Hiccup)

उचकी हे आमाशय विकारातील एक लक्षण आहे. श्वासनलिकेचे तोंड उघडले म्हणजे पोटाचा पडदा व श्वासनलिका यांच्या कार्याची आपसात सुसंगती असावी लागते. श्वासनलिका बंद झाली म्हणजे पोटाचा पडदा सैल होतो. या नेहमीच्या कार्यात व्हेगस नेर्व्ह ( Vagus nerve ) हा ज्ञानतंतू उत्तेजित झाल्यामुळे बिघाड झाला म्हणजे आकुंचित होतो व उचकी लागते. उचकी का लागते/येत:- १) पोट … Read more

वांती (Vomiting) उलटी/ओकारी

आमाशयातील द्रवमिश्रीत पदार्थ तोंडावाटे बाहेर पडला तर त्याला ‘ वांती ‘ असे म्हणतात. वांती हा स्वतंत्र रोग नसून कित्येक रोगांत आढळणारे हे एक लक्षण आहे. १) पित्त वाढल्याने उलट्या होतात. २) आमाशयाच्या रोगात (अजीर्ण, अग्निमांद्य इत्यादी रोगांत) उलट्या होतात. ३) यकृताच्या रोगात ४) मुत्रपिंडाच्या रोगात ५) मेंदूच्या रोगात ६) गर्भाशयाच्या रोगात उलट्या होतात. ७) कॉलऱ्यामध्ये … Read more

कृमी, जंत (Worms)

पोटातील आतड्यात ज्या कृमी होतात त्यास जंत असे म्हणतात. बहुत करून लहान मुलांच्या पोटात जंताचा विकार होतो. निदान – मळावाटे एखादा जंत पडणे हेच पोटात जंत झाल्याचे खात्रीचे लक्षण समजावे. इतर लक्षणामध्ये मुलांच्या पोटात दुखते पोट काहीसे मोठे व फुगून आलेले दिसते. केव्हा केव्हा मूल खा खा करते परंतु अन्न नीट पचत नाही. जुलाब होतात … Read more

पोटशूळ (Colic)

पोटशूळ म्हणजे पोटात दुखणे. पोटशूळ अनेक कारणांमुळे सुरू होऊ शकते ते खालील प्रमाणे… १) वातुळ पदार्थ (पोटात वायू धरणारे पदार्थ खाल्ल्याने पोट दुखते) २) मलावरोध झाल्यानेही पोट दुखते. ३) थंडीमुळे पोट दुखते. ४) जंतामुळे ही पोट दुखते. ५) धास्ती, भिती, चिंता इत्यादी मानसिक कारणाने पोट दुखते. ६) आंतड्याच्या आतील बाजूच्या स्नायू संकोचाने पोट दुखते. ७) … Read more

धनुर्वात ( TETANUS )

अत्यंत भयानक व प्राणघातक असा हा आजार आहे. जखमेतून धनुर्वाताच्या क्लोस्ट्रीडियम टिटॅनी (Clostridium Tetani) या जंतूचा प्रवेश झाल्याने रोग होतो. कधी कधी जखमेशिवाय ही हा रोग होतो. या रोगात स्नायूचा संकोच होतो. मधून मधून झटके येतात. धनुर्वाताचे जंतू घोड्याची लीद, शेणखत, केरकचरा, गोठे, गंजलेले लोखंड, घोड्याच्या पागा या ठिकाणी अधिक असतात. शरीरात नैसर्गिकपणे या रोगाविरूद्ध … Read more

एड्स बद्दल आयुर्वेद काय म्हणते ?

प्रतिलोम क्षय AQUIRED IMMUNO DEFFICIENCY SYNDROMEज्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवील ती व्यक्ती पाहता पाहता जळून भस्म होनार असा भगवान महादेवाच्या वरदानामुळे भस्मासुराला अशी काही शक्ती प्राप्त झाली होते. पुराण ग्रंथातून भस्मासुरासंबंधी अशी एक कथा सांगण्यात येते. आधुनिक काळात एड्स या रोगाला देखील तशीच शक्ती प्राप्त झाली आहे. या रोगांच्या संसर्गात जो कोणी येईल तो झिजून … Read more