वयाच्या 30 वर्षानंतर हाडांचे काही त्रास उद्भवू नयेत यासाठी खालील सहा गोष्टी लक्षात ठेवा

जसे जसे वय वाढत जाईल तसे तसे अनेक जणांची हाडे कमजोर व्हायला लागतात. म्हणूनच वय झाल्यानंतर महिला असेल किंवा पुरुष हाडांचे त्रास जसे की गुडघेदुखी कंबर दुखी पाठ दुखी यासारख्या समस्या उद्भवायला सुरुवात होते. वयाच्या 30 वर्षापर्यंत हाडांमध्ये नवनवीन पेशी तयार होण्याचे प्रमाण सुरूच असते त्यानंतर ते हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणून तीस वर्षाच्या नंतर हाडांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

खाली दिलेल्या सहा गोष्टी यांचे व्यवस्थित पालन केल्यास आपली हाडे मजबूत होण्यास मदत होईल.

विटामिन डी ची पूर्तता


आपल्या शरीरात हाडांच्या मजबुतीसाठी सर्वात जास्त गरज असते ती कॅल्शियमची, आणि आपला अन्नपदार्थांमधून कॅल्शियम शोषून घेण्याचे काम विटामिन डी करत असते. त्यामुळे विटामिन डी चे महत्व खूप जास्त आहे. विटामिन डी चे प्रमाण जर योग्य असेल तर शक्यतो हाडांचे कुठलेही त्रास होत नाही. सूर्यप्रकाशाची किरणे हा विटामिन डी चा सर्वात मोठा स्त्रोत आहे. म्हणून सकाळी कोवळ्या उन्हात निदान 15 मिनिट तरी बसावे.

कॅल्शियम चे प्रमाण किती असावे?


हाडांच्या मजबुतीसाठी आपल्या शरीरात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असणे गरजेचे असते. लिंग वय याचा विचार करून प्रत्येकाच्या शरीरात कॅल्शियम चे प्रमाण किती असावे हे आपण पाहू. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा कॅल्शियमची जास्त आवश्यकता असते महिलांमध्ये साधारण 50 वर्षापर्यंतच्या स्त्रियांमध्ये दररोज 1200 मिलिग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. तर पन्नास वर्षापर्यंत पुरुषांमध्ये 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.

व्यायामाची आवश्यकता


नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्ती ची आणि व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीची तुलना केल्यास किंवा व्यक्ती व्यायाम नियमितपणे करतो त्याची हाडे मजबूत असल्याचे आढळून येते. आपला दैनंदिन जीवन क्रियेमध्ये व्यायामाचा समावेश हा असायलाच पाहिजे. जॉगिंग धावणे चालणे वजन उचलणे यासारखे व्यायाम हळूहळू सुरू करून आपण आपले हाडे मजबूत बनवू शकतो.

हाडांचे काही त्रास

धूम्रपान करू नये


धूम्रपान करणे हे तुमच्या हाडांना कमजोर करण्याचे एक मोठे कारण आहे. हे ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण आतड्यांमधून जे कॅल्शियम शोषून घेतले जाते त्यामध्ये बाधा आणण्याचे काम हे धूम्रपानामुळे होते. धुम्रपानामुळे हाडांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो. ज्यामुळे हाडांना पोषक तत्त्व आणि ऑक्सिजन मिळत नाहीत. जर तुम्हाला तुमच्या हाडांची काळजी असेल तर धूम्रपान आणि मद्यपान आजच बंद करा.

शरीराला आवश्यक प्रोटीन ची पूर्तता करा


आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी प्रोटीन ची आवश्यकता असते, म्हणून दैनंदिन जीवनातील आहारामध्ये प्रोटीन युक्त पदार्थांचा वापर करायलाच हवा. विविध प्रकारच्या डाळी पनीर सोयाबीन दूध यासारख्या पदार्थांचा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता.

लठ्ठपणा


जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या ला हाडांचा कुठलाही त्रास होऊ नये तर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे. आपला शरीराचा पूर्ण भार हा आपल्या पायांवर व पायाच्या सांध्यांमध्ये येतो, जर वजन जास्त असेल तर त्याचा हाडांना त्रास होतो. म्हणून वजन नियंत्रणात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

5 thoughts on “वयाच्या 30 वर्षानंतर हाडांचे काही त्रास उद्भवू नयेत यासाठी खालील सहा गोष्टी लक्षात ठेवा”

  1. अतिशय उपयुक्त माहिती 👍👌👆

    Reply

Leave a Comment