योगासन व प्राणायमामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आजार देखील बरे होऊ शकतात योग करण्यासाठी शरीराला खूप ताण देण्याची गरज पडत नाही, यासाठी बाहेर कुठेही जाण्याची ही गरज पडत नाही. आपण आपल्या घरीच योगासन व प्राणायाम करू शकतो, तसेच योगासनाच्या माध्यमातून लठ्ठपणा, मधुमेह, हाय बीपी, अशा दीर्घ आजारावर ही मात करू शकतो.
योगासनांचे फायदे(Benefits of Yogasanas): –
योग केल्याने शरीर आणि मन ताजेतवाने राहते तसेच शरीराचा व मनाचा थकवा संपतो योगासन हे अध्यात्मिक दृष्ट्या देखील आपल्याला फायदा देतात.
योगासना मुळे शरीराच्या अंतर्गत प्रक्रिया सुरळीत राहतात.
योगासनांमुळे पोट व्यवस्थित साफ होते तसेच पचनशक्ती सुधारते.
योगासन हे आपल्या मणक्याची लवचिकता वाढवून पूर्ण शरीर देखील लवचिक बनवते.
योगासनांमुळे आपल्या मांसपेशींना ताकत मिळते, तसेच लठ्ठपणा कमी होऊन अशक्त व बारीक व्यक्ती देखील तंदुरुस्त बनतो.
योगासन केल्यामुळे पूर्ण शरीरामध्ये रक्त प्रवाह वाढतो व चेहऱ्यावरती तेज येऊन त्वचा चमकदार बनते.
योगासनामुळे शरीरामध्ये भरपूर ऑक्सीजन घेतला जातो ज्यामुळे आपले फुफुस निरोगी राहतात. व शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळते.
थोडक्यात सांगायला गेलं तर योगासन हे आपल्यासाठी वरदानच आहे त्याचा शरीराच्या सर्व भागावर परिणाम होतो व सर्व क्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.
ज्याप्रकारे कुठल्याही गोष्टीचे फायदे असतात तसेच त्या गोष्टीचे नुकसान ही असतात म्हणून जर आपण चुकीच्या पद्धतीने योगासन केली तर मात्र आपल्याला योगासनांमुळे नुकसान होऊ शकते
योग करा परंतु सावधगिरी बाळगा
जेवण केल्यानंतर योगा अभ्यास करू नये. कारण पोटामध्ये अन्न शिल्लक असल्यामुळे आपण योग अभ्यास करू शकत नाही परंतु जर आपण त्रास होत असताना देखील योगासन करत असाल तर मात्र ते आपल्याला नुकसान देऊ शकते. त्यामुळे जेवण आणि योग अभ्यासामध्ये किमान दोन तासांचे अंतर असले पाहिजे.
योगाभ्यास करताना आरामदायी व सेल कपडे अंगावरती असावे.
मासिक पाळी मध्ये स्त्रियांनी योगाभ्यास करू नये. विशेष करून सूर्यनमस्कार व शरीरावर जास्त ताण येणारे योगासने तर करूच नये.
योगासन करण्यापूर्वी देखील सूक्ष्म व्यायाम करणे गरजेचे असते. यामुळे आपल्या शरीराला झटका किंवा इतर कुठलीही समस्या होत नाही. त्यामुळे योगासन सुरू करण्याअगोदर सूक्ष्म व्यायाम करावे तसेच योगासनं अभ्यास झाल्यानंतर दहा मिनिटं शवासणाचा अभ्यास करावा.
योगाभ्यास व प्राणायमाचा चांगला ताळमेळ लागल्यानंतर आपण मेडिटेशन म्हणजे ध्यान या कडे वाटचाल करावी. मेडिटेशन हे आपल्या मेंदू वर तील तणाव कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. मेडिटेशन मुळे हृदयाची गती नियंत्रित ठेवता येते. त्याचबरोबर दिवसभर उत्साही राहण्यासाठी व सकारात्मक विचारासाठी रोज सकाळी योग अभ्यास झाल्यानंतर आपण मेडिटेशन करू शकता.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपली योग शैली निवडा म्हणजेच आपल्या रोजच्या योगाभ्यासा मधील ठराविक आसने निवडा. त्याचबरोबर हटयोग किंवा आयंगर योग याच्या मधील देखील काही असणे आपण आपल्या योग अभ्यासामध्ये घेऊ शकता जेणेकरून आपल्याला हवे असलेले परिणाम या अभ्यासातून मिळतील.
I like this info.
Pl keep me informed updated information
Very useful ☺️👍
करा योग रहा निरोग
Very best n useful for mainting good health.
खुप महत्वपुर्ण माहिती, खुप समाधानकारक
Iam a yoga Teacher from YCMOU university, I would like something new from your app.
Thanking you.
Very nice helpful information 👍.
मस्त
खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे.👍
कृपया हटयोग व अय्यंगार योग या बद्दल वीशलेषण केलेत तर बरे होईल
कृपया हटयोग व अय्यंगार योग या बद्दल वीशलेषण केलेत तर बरे होईल
V.nice information
हो, लवकरच यावर ही एक लेख पाठवतो
Awesome
Excellent