वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये मध टाकून पीत आहात का?आत्ताच सावध व्हा !

तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये मध टाकून पीत आहात का?
आत्ताच सावध व्हा आणि हा ब्लॉग पूर्ण वाचा.
आजकाल आपण सगळीकडे ऐकतो की सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध घेतल्यास आपले वजन झपाट्याने कमी होते. तसेच सर्वत्र मधाचे अनेक फायदे सांगितले जातात.
परंतु आयुर्वेदामध्ये या संदर्भात काय सांगितले आहे यासंदर्भात आज आपण या ब्लॉगमध्ये माहिती घेऊ.

गरम पाण्यामध्ये मध

आयुर्वेदामध्ये आपल्याला मधाबद्दल अनेक गोष्टी लिहिलेल्या सापडतात. आचार्य चरक आणि आचार्य सुश्रुत यांनी देखील मधाबद्दल खूप काही लिहून ठेवलेले आहे.जसे की मध किती प्रकारचे असतात, कोणत्या माशांनी बनवलेला मध चांगला असतो, मधाचे गुणधर्म, मधाचे सेवन कोण करायला हवे तसेच कोण करू नये, कोणत्या परिस्थितीमध्ये मध खाऊ नये, त्याचे प्रमाण किती असावे या सर्व गोष्टींबाबत आयुर्वेदामध्ये आपल्याला वर्णन पाहायला मिळते.

आचार्य सुश्रुत मधाबद्दल सुश्रुत सूत्रस्थान 45 अध्याय 132 मध्ये लिहितात की-


मधु तु मधुरं कषायानुरसं रूक्षं शीतमग्निदीपनं वर्ण्यं स्वर्यं लघु सुकुमारं लेखनं हृद्यं वाजीकरणं सन्धानं शोधनं रोपणं सिंग्राहि चक्षुष्यं प्रसादनं सूक्ष्ममार्गानुसारि पित्तश्लेष्ममेदोमेहहिक्काश्वासकासातिसारच्छर्दितृष्णाकृ-मिविषप्रशमनं ह्लादि त्रिदोषप्रशमनं च तत्तुलघुत्वात् कफघ्नं पैच्छिल्यान्माधुर्यात् कषायभावाच्च वातपित्तघ्नम् ||

याचा अर्थ असा की मध हा चवीने मधुर म्हणजेच गोड आहे, हा शीत आणि रुक्ष आहे. आपल्या शरीरातील अग्नी वाढवणारा, बल वाढवणारा, पचनासाठी हलका, हृदयासाठी अतिशय उपयुक्त, शरीरावरील व्रण कमी करणारा, डोळ्यांसाठी उपयुक्त, शरीरातील अति सूक्ष्म भागामध्ये प्रवेश करणारा, पित्त आणि कफ कमी करणारा, शरीरातील मेद कमी करणारा प्रमेह,अतिसार,श्वास,तृष्णा,कृमी यांना कमी करणारा तसेच स्त्री दोषांना संतुलित करणारा आहे. मध लघु गुणाचा असल्यामुळे तो शरीरातील कफाचा नाश करतो तसेच मधुर आणि कशा रस असल्यामुळे वात आणि पित्ताचा नाश करतो.

अशाप्रकारे आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये मधाचे वर्णन मिळते.
मधमाशीच्या पोळीतील मध हा वात पित्त आणि कफ वाढवणारा असतो. त्यामुळे कच्चा स्वरूपातील मध कधीही वापरू नये,मध हा नेहमी जुना असावा.

आता आपण पाहूयात सकाळी गरम पाण्याबरोबर मध कसा घ्यावा –
एका भांड्यामध्ये पाणी घ्यावे. ते पाणी उकळून उकळून अर्ध्यापेक्षा कमी होऊ द्यावे. नंतर ते पाणी थंड होऊ द्यावे पाणी सामान्य तापमानाला आल्यास मगच त्यामध्ये मध टाकावा. पाणी उकळून थंड होऊ दिल्यास ते पचना अतिशय हलके होते व आपल्या शरीरातील कफ कमी करण्यास पर्यायी शरीराची चरबी कमी करण्यास मदत करते.

महर्षी सुश्रुत मध कसा घेऊ नये याबद्दल देखील खालील प्रमाणे लिहितात.

उष्णैर्विरुध्यते सर्वं विषान्वयतया मधु
उष्णार्तमुष्णैरुष्णे वा तन्निहन्ति यथा विषम्
तत्सौकुमार्याच्च तथैव शैत्यान्नानौषधीनां रससंभवाच्च
उष्णैर्विरुध्येत विशेषतश्च तथाऽन्तरीक्षेण जलेन चापि ||

म्हणजेच मध कधीही गरम करू नये किंवा कुठल्याही गरम पदार्थांमध्ये मध मिक्स करू नये. एवढेच नाही तर जे उष्ण ऋतू असतात त्या ऋतूमध्ये सुद्धा मध खाणे आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकते. तसेच ज्यांना उष्णतेमुळे काही आजार उद्भवले असतील त्यांनी सुद्धा मधाचे सेवन करू नये.

चरक संहिता सूत्रस्थान 27 मध्ये आचार्य चरक यांनी सांगितले आहे की गरम मध हे मृत्यूचे कारण ठरू शकते.
मधमाशांनी मध हा विविध ठिकाणाहून गोळा केलेला असतो त्यातील काही फुले विषारी देखील असतात, त्याचे गुणधर्म हे मधामध्ये सुद्धा काही प्रमाणात उतरता. म्हणून उष्ण मध हा आपल्यासाठी अहितकारक असतो.
मध नेहमी कमी प्रमाणात घ्यायला हवा, मध जास्त खाल्ल्यास त्याचे पचन व्यवस्थित होत नाही व आपल्याला त्रास होऊ शकतो.

म्हणून जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये मध टाकून घेत असाल तर वरील काळजी घेणे खूप गरजेचे आहे कधीही गरम पाण्यामध्ये मत टाकू नका ते पाणी आधी थंड होऊ द्या नंतरच मध मिक्स करून ते तुम्ही पिवू शकता. वजन कमी करण्यासाठी मध तुम्हाला सहाय्यता नक्की करेल पण फक्त मदत खाल्ल्याने वजन कमी होणार असे नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनशैली खाणे पिणे व्यवस्थित झोप ताणतणाव या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावे लागेल. त्यावेळी तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या वजन कमी करू शकाल.

7 thoughts on “वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये मध टाकून पीत आहात का?आत्ताच सावध व्हा !”

  1. नमस्कार.
    आजकाल आरोग्याच्या बाबतीत फार वेगवेगळी मते व सल्ले दीले जात आहेत . एखाद्या ने अमुक एक करा म्हणून सांगितलं की बरोबर त्याच्या विरोधात दुसऱ्या ची पोस्ट येते त्यामुळे आमच्या सारख्या मुर्ख अज्ञानी लोकानी कोणाचं ऐकायचं आणी कोणाचं नाही याचा कोण खुलासा करेल काय ?

    Reply
    • आपली शंका अतिशय योग्य आहे. म्हणूनच कोणावरही विश्वास न ठेवता आपल्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये जी माहिती दिली आहे तीच शास्त्रशुद्ध आणि योग्य आहे. म्हणूनच या लेखामध्ये आम्ही आयुर्वेदाच्या श्लोकासहित त्याचे सविस्तर वर्णन केले आहे.

      Reply
    • खूप छान माहिती मिळाली.अजूनही बरेच लोक सकाळी सकाळी कोमट पाण्यात लिंबू व मध टाकून पितात.

      Reply
  2. खूप छान माहिती तुम्ही देता. त्वचा उजळ होण्यासाठी काय खावे, त्यामुळे जेणेकरून काळवंडलेली त्वचा उजळ होऊ शकेल.

    Reply

Leave a Comment