शिवाम्बू उपचार पद्धती

चिकित्सा आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या विष - द्रव्यांशी लढून, त्यांना शरीराबाहेर टाकून देण्यासाठी शरीरातच प्रतिद्रव्ये तयार करण्याची निसर्गाची योजना आता पाश्चात्य देशांतील डॉक्टरांनादेखील मान्य झालेली आहे. माणसाला लागणारी जरूर तेवढी औषधीद्रव्ये रात्रीच्या वेळी शरीरात तयार होत असतात. मानवी शरीरातील संगणक नियमितपणे हे कार्य पार पाडत असतो. रात्री तयार झालेली ही सर्व द्रव्ये माणसाच्या सकाळच्या पहिल्या लघवीमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात, आणि म्हणूनच सकाळी होणारी ही पहिली लघवी प्राशन केली तर शरीराला आवश्यक असलेली क्षारादी सर्व द्रव्यांची गरज पूर्ण होऊ शकते. याच मुख्य तत्त्वावर *'मूत्रोपचार पद्धती'* ची उभारणी झाली आहे. मूत्राचा हा महत्त्वाचा गुणधर्म लक्षात घेऊनच, जपानमध्ये मानवी मूत्रापासून महागडी इंजेक्शन्स तयार केली जातात. मूत्राचे प्राशन करण्याची पद्धतीही ' शिवपुराणां' मध्ये सविस्तर वर्णन करण्यात आली आहे. गुन्हेगार लोकांनाही मूत्राचा उपयोग माहीत असतो. पकडले जाताच, सर्वप्रथम ते स्वमूत्र प्राशन करतात. त्यामुळे नंतर होणारी बेदम मारहाण सहन करणे व मारहाणीचे दुष्परिणाम टाळणे त्यांना लवकर व अधिक प्रमाणात सोपे जाते. दीर्घकाल चालणाऱ्या उपवासात व्यक्तीने आपले मूत्र प्राशन करणे हितकारक ठरेल, असा सल्ला दिला गेला आहे. भारताचे माजी पंतप्रधान आणि या *' शिवाम्बू उपचार '* पद्धतीचे मोठे समर्थक श्री . मोरारजीभाई देसाई स्वमूत्र प्राशन करत होते आणि त्यानेच अंगाला मसाज करून घेत होते. त्यांचा हा परिपाठ २६ वर्षांपेक्षा अधिक काळ अखंडपणे चालू होता. ९९ व्या वर्षीही अगदी अखेरच्या दिवसांतही त्यांचे शरीर लालबुंद दिसत होते, याचे रहस्य हेच असावे. त्यांच्या अंगाला सुरकुत्या पडलेल्या नव्हत्या; त्यांची त्वचा निरोगी आणि तुकतुकीत होती. शिवाम्बू नियमितपणे प्राशन करून आणि डोळे धुण्यासाठीही त्याचा उपयोग करून, हे शिवाम्बू - शास्त्र डोळ्यांच्या मोतिबिंदूवरही रामबाण उपाय असल्याचे त्यांनी दाखवून दिले. डोळ्यांत पडलेला मोतिबिंदू मध्ये ही आराम मिळू शकतो, या उपचाराने त्यांनी २५ वर्षांपेक्षा अधिक काळ जीर्ण आजार त्यांनी यशस्वीपणे रोखून धरला होता. सर्व प्रकारच्या जीर्ण रोगांवर प्रभावी उपाय म्हणून शिवाम्बू - प्राशनाची शिफारस करण्यात आली आहे. या उपचाराने ‘ एड्स'च्या रुग्णांनादेखील बरे करण्यात आले असल्याचा दावा अमेरिकन डॉक्टर ब्रिट्रिस बार्टर यांनी जाहीररीत्या केला आहे. माझे तर असे म्हणणे आहे की, रक्ताचा कर्करोग आणि ‘ थलसेमिया ' यांवर या ग्रंथात सुचवलेल्या उपचारांच्या जोडीला स्वमूत्रोपचार पद्धतीची सांगड घातली तर ‘ एड्स' वर कितीतरी जलदगतीने नियंत्रण मिळवता येईल…

उपयोग कसा करावा :
सुरवातीचे काही थेंब वगळून बाकीचे मूत्र स्वच्छ ग्लासात किंवा उभ्या भांड्यात गोळा करा अथवा ओंजळीत जमा करून प्राशन करा.

डोळ्यांवर उपाय :
एखादया पसरट वाडग्यात किंवा तळहातावर घेऊन मूत्र थंड होऊ दयावे. नंतर त्याचे भपकारे मारून डोळे धुवावे. या उपायाने डोळे चांगले व पाणीदार राहतात. मोतीबिंदू सुरवातीसच रोखून धरला जातो.

दातांवर उपयोग :
दातांच्या कोणत्याही समस्येवर – दात हालत असले तरीही याचा फायदा होतो. किमान पाच मिनिटे मूत्राच्या गुळण्या कराव्या – हिरड्यांना त्याने मालिश करावे.

केसांची काळजी :
डोक्यावरील केस आणि कातडीला मूत्र चोळून लावल्याने ते रेशमासारखे मऊ होतात . त्यांतील कोंडा व जंतू वगैरे नाहीसे होतात. दाढी करण्यापूर्वीही ते चेहऱ्यावर चोपडल्याने दाढी सहज, स्वच्छ व गुळगुळीत होते. दाढी झाल्यावर वापरायचे लोशन म्हणूनही त्याचा उपयोग होतो. मूत्राच्या अशा उपयोगाने चेहऱ्याची त्वचा तुकतुकीत होते व चेहऱ्याच्या त्वचेला तकाकी येते. त्यामुळे स्त्री व पुरुष या दोघांनीही त्याचा लोशन म्हणून उपयोग करण्यास हरकत नाही.

त्वचेच्या समस्या :
त्वचेच्या समस्यांवर हे एक उत्तम औषध आहे. उपदंश ( सिफिलिस ) व चिघळणारी जखम ( गँगरिन ) पांढरे डाग इत्यादींवर मूत्राचा उपयोग चागला होतो.

त्वचेवर वापरण्याची रीत :
स्वमूत्र तापवून ते थंड होऊ दयावे. त्यावर जमा झालेला गाळ काढून टाकावा. कापसाचा बोळा त्या कोमट द्रवात बुडवून त्याने दुखणाऱ्या भागावर हळूहळू मसाज करावा. ही क्रिया दोन – तीन मिनिटेपर्यंत चालू ठेवावी. मूत्रोपचार सुरू करण्यापूर्वी, संबंधित अवयवांना बर्फाने दोन ते तीन मिनिटे शेक दयावा. मूत्रोपचार झालेला भाग शेवटी स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हा उपचार चालू असताना रोज दोन ते तीन कप कच्चा रस घेऊ शकतो, या उपचाराने पांढरे डागही बरे होतात.

वरीलपैकी कुठलाही प्रयोग करण्याअगोदर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच व त्याच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत.

2 thoughts on “शिवाम्बू उपचार पद्धती”

  1. डॉक्टर नमस्कार,बरेच दिवस नाही बरीच वर्षे मला या शिवांबु उपचार पद्धतीबद्दल एक शंका आहे.
    आपल्या शरीर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मल आणि मूत्र हे दोन्ही घटक हे आपल्या शरीराने खाल्लेल्या अन्नाचं पचन करून त्यातून नको असलेले म्हणून बाहेर टाकले जातात.याला एक प्रकारचा चोथा आणि त्याज्य घटक म्हणून संबोधले जाते. तर मग हे नको असलेले मूत्र वरील उपचार पद्धती नुसार उपयोगी कसे होऊ शकेल?
    कृपया मार्गदर्शन केले तर बरे होईल.

    Reply
    • सर्व प्रथम सांगितल्याप्रमाणे आपण दिवसभराचे मूत्र चिकित्सा करण्यासाठी घेत नाही, फक्त सकाळी झोपेतून उठल्यानंतरचे, त्याचे कारण ही दिले आहे, आणि मल-मुत्र टाकावूच असते असे आजचे विज्ञान ही सांगत नाही आणि आयुर्वेद ही सांगत नाही. आयुर्वेदात इतर ही प्राण्यांच्या मूत्रा बद्दल सविस्तर लिहिले आहे, त्यात सर्वात उपयोगी गोमूत्र सांगितले आहे.

      Reply

Leave a Comment